Headphone Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Headphone Side Effects : हेडफोन्सचा अतिवापर, कानसह हृदयाला घातक !

Headphone Uses : वयोवृद्धांपासून ते तरुणाईपर्यंत प्रत्येकाला हेडफोन घालावेसे वाटतात.

डॉ. माधव सावरगावे

Ear Damage Problems : जगभरात हल्ली प्रत्येकजण मोबाईल फोनचा वापर करताना दिसतो. हे काय कमी होते म्हणून वयोवृद्धांपासून ते तरुणाईपर्यंत प्रत्येकाला हेडफोन घालावेसे वाटतात. या हेडफोनमध्ये अनेक नवनवीन ब्रॅन्ड देखील आपल्याला पाहायला मिळतात

पण या हेडफोनचा (Headphones) जितका फायदा आहे तितकाच आरोग्याला धोका देखील आहे. रस्त्यावर, बसमध्ये- रेल्वेमध्ये, नोकरीच्या (Job) ठिकाणी कानात हेडफोन घालून काम करणारी, गाणे ऐकणारी महिला-पुरुष मंडळी आपल्या आजूबाजूला खूप आहेत.

त्यात आपणही मागे नाहीत. पण हे असेच अधिक काळ राहिले तर कानाचे आजार वाढून आपण बहिरे होऊ. कारण 10 पैकी 2 जणांना सध्या याच कारणामुळे ऐकण्यासाठी अडचण येतेय हे समोर आलंय. त्यामुळे आता कान सांभाळा...

घरातून ऑफिसपर्यंत (Office), कुठेही जा आजूबाजूला तर कानात एअरफोन - हेडफोन घालून स्वतःमध्ये मग्न असणारे मुलं-मुली महिला (Women) पुरुष, मंडळी आपण पाहतो. त्यात आपणही तेच करतो. पण यामध्ये देखील आपल्याला काही सावधगिरी बाळगायला हवी.

हेडफोन घालून चालताना, गाडी चालवताना, फिरताना अपघात झाल्याचे प्रकरण आपल्या समोर वेळोवेळी येत असतात. त्यासोबतच सर्वात मोठा धोका आहे तो आपल्या कानाला. सतत हेडफोन, इयरफोनने तरुणांना बहिरेपणास तोंड द्यावे लागत आहे. नियमित हेडफोन, इयरफोन वापरणाऱ्या १० पैकी २ तरुणांना श्रवणदोष येत असल्याचे निरीक्षण छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. सुनील देशमुख, विभागप्रमुख घाटीमधल्या डॉक्टरांनी नोंदविले आहे.

त्यांनी सांगितले की, कानाचे आजार असलेले, बहिरेपणा आलेले रुग्ण आता संभाजीनगरच्या घाटीमध्ये वाढत आहेत. विशेष म्हणजे आठवड्यातून ४ दिवस होणारी कान- नाक-घसा विभागाची ओपीडी आता दररोज सुरू ठेवावी लागत आहे. इतकेच काय आठवड्यातून तीनच दिवस होणाऱ्या शस्त्रक्रियाही आता दररोज होऊ लागल्या आहेत.

तसेच डॉ. प्रिया गुप्ता, ऑडिओलॉजिस्ट म्हणतात जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी आज 3 मार्च जागतिक श्रवण दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने कानाच्या आजारावर आता सर्वांना जागृत करण्याचं काम हाती घेण्यात आल आहे. कारण दररोज घाटीच्या ओपीडीत येणाऱ्या रुग्णांमध्ये ५० टक्के रुग्ण कानाशी संबंधीत आजारांचे असतात. यात कानाची नस कमजोर झाल्याने, कान फुटणे, वाहणे, जन्मतः बहिरेपणा हेडफोन वापरामुळे श्रवणदोष निर्माण झालेले रुग्ण उपचारासाठी येतात.

कानाचे आजार टाळायचे असेल तर काय कराल ?

  • सतत हेडफोन, इयरफोन वापरू नये. थोडी कानालाही विश्रांती द्यावी.

  • गोंगाटात काम करताना कामगारांनी श्रवण संरक्षण उपकरण वापरले पाहिजे.

  • सतत सर्दी, खोकला होत असेल तर वेळीच उपचार घ्यावा.

  • कानात काडी, टोकदार वस्तू टाकता कामा नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT