High cholesterol causes google
लाईफस्टाईल

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Daily lifestyle habits causing heart attack risk: आजकाल तरुणांमध्येही हार्ट अटॅकची प्रकरणं वाढत असून यामागे अपुरी झोप, तणाव, फास्ट फूड आणि दीर्घकाळ बसण्यासारख्या सवयी कारणीभूत ठरत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल हार्ट अटॅक येण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. यामध्ये केवळ प्रौढ व्यक्तीच नाही तर तरूणांमध्येही हे प्रमाण वाढताना दिसतंय. पण परिस्थिती अशी का बदलली याचा विचार तुम्ही कधी केलाय का? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यामागे आपल्या दररोजच्या काही सवयीच कारणीभूत आहेत.

मेम्फिसमधील हार्ट ट्रान्सप्लांट कार्डिओलॉजिस्ट डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये सांगितलंय की, आपल्याला फारशा गंभीर न वाटणाऱ्या अनेक सवयी येणाऱ्या काळात हृदयासाठी हानिकारक ठरू शकतात.

ते म्हणाले, “माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला अशा सवयींचं दीर्घकालीन परिणाम वारंवार दिसतात. या सवयी कालांतराने तुमच्या हृदयावर, उर्जेवर आणि सहनशक्तीवर परिणाम करतात. अशा कोणत्या रोजच्या सवयी आहेत ज्या नकळत तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरतात ते पाहूया.

अपुरी झोप

डॉ. यारानोव्ह सांगतात, झोप आपल्या शरीरासाठी गरजेची आहे. पुरेशी विश्रांती न मिळाल्यास रक्तदाब वाढतो, वजन वाढतं आणि थकवा कायम राहतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार, पुरेशी झोप न घेणाऱ्या किशोरवयीन मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनीच्या समस्या उद्भवतात.

दिवसभर बसून फोनवर स्क्रोल करणं

बसणं हे आता नव्या प्रकारचं धूम्रपान आपण म्हणू शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. बसून सतत फोन स्क्रोल करणं ही सवय आरोग्यासाठी धोकादायक सवय. तुमचा डेस्क असो, सोफा असो किंवा कार खूप वेळ स्थिर बसणं यामुळे तुमच्या पाठ, पचनसंस्था आणि हृदयावर वाईट परिणाम होतो. २०२४ च्या एका अभ्यासात आढळलंय की, दिवसभर जास्त वेळ बसणं किंवा आडवं राहिल्याने हृदयविकार आणि मृत्यूचा धोका वाढवतो.

तणावाकडे दुर्लक्ष

आपण अनेकदा स्वतःला ठीक असल्याचं सांगतो, जरी आतून तणावग्रस्त असतो. डॉ. यारानोव्ह यांच्या मते, तणावाकडे दुर्लक्ष करणं हे हृदयासाठी धोक्याचे संकेत आहे. दीर्घकालीन तणाव फक्त मनावरच नाही तर शरीरावरही परिणाम करतो २०२२ च्या एका अभ्यासातही दीर्घ आणि तीव्र तणावामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो असं आढळलंय.

जे पटकन मिळेल ते खाणं

आपण बिझी शेड्युलमुळे भूक लागली की हाताला जे मिळेल ते खातो. डॉक्टर सांगतात की, नाश्ता टाळणं, फास्ट फूड म्हणून दुपारचे जेवणं आणि साखरयुक्त खाणं खाणं यामुळे रक्तातील साखर वाढते आणि शरीराला त्याचा त्रास होतो.

नेहमी ‘हो’ म्हणणं

जर तुम्ही सतत इतरांसाठी सर्व काही करत असाल तर लक्षात ठेवा की तुमचं हृदयही त्याचा ताण सहन करतंय. डॉ. यारानोव्ह सांगतात की, रिकाम्या कपातून काही देता येत नाही. त्यामुळे गरज असताना नाही म्हणण्याऐवजी सतत हो म्हणणं हा मोठा इशारा आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ; प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवलं?

Places To Avoid Visit In Summer: एप्रिल- मे महिन्यात या 3 ठिकाणी बिलकूल भेट देऊ नका, गर्मीमुळे व्हाल हैराण

Borivali Tourism : चला वीकेंडला फिरायला! उन्हाळ्यात थंडावा देणारी 'बोरीवली'तील ५ सुंदर पिकनिक स्पॉट

Crime: सावत्र बाप करायचा लैंगिक अत्याचार; वैतागून घर सोडून पळालेल्या मुलीवर दोघांकडून सामूहिक बलात्कार

April 2026 Festival Calendar: एप्रिल महिन्यात कोणकोणते महत्वाचे सण आहेत? A टू Z माहिती एकाच क्लिकवर

SCROLL FOR NEXT