Can Women's Sweat Attract Men? Science Behind Body Odour And Attraction saam tv
लाईफस्टाईल

Women Sweat Attraction: महिलांच्या घामाच्या वासामुळे पुरुष आकर्षित होतात? संशोधनातून काय समोर आलं?

Why Are Men Attracted To Women Sweat: संशोधनानुसार, शरीरातून उत्सर्जित होणारे हे संकेत प्रत्यक्षात एक प्रकारचा रासायनिक संदेश असतात. जो आपला मेंदू दृश्य माहितीच्या अभावातही ओळखू शकतो.

Bharat Jadhav

  • महिलांच्या घामाच्या वासामुळे पुरुष आकर्षित होऊ शकतात का?

  • महिलांच्या विशिष्ट भावनिक स्थितीमध्ये शरीरातून वेगळ्या प्रकारचा गंध उत्सर्जित होतो.

  • केंट विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासातून धक्कादायक खुलासा

पुरुष स्त्रियांच्या घामामुळे त्यांच्याकडे आकर्षित होतात, हा धक्कादायक खुलासा एका नवीन संशोधनातून झालाय. युनायटेड किंगडममधील केंट विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात जेव्हा स्त्रिया विशिष्ट भावनिक स्थितीमध्ये असतात, तेव्हा त्यांच्या शरीरातून उत्सर्जित होणारा गंध पुरुषांच्या मेंदूवर एका वेगळ्याच प्रकारे परिणाम करत असतो. हे संशोधनानुसार, शरीरातून उत्सर्जित होणारे हे संकेत,एक प्रकारचा रासायनिक संदेश असतात. जो आपला मेंदू काहीही न पाहताही ग्रहण करू शकतो. म्हणूनच, कधीकधी केवळ वासाच्या आधारे आकर्षण निर्माण होऊ शकते.

संशोधनातून काय निष्पन्न झाले?

'सायकॉलॉजी टुडे' (Psychology Today) नुसार, जेव्हा पुरुषांना विविध परिस्थितींत गोळा केलेला स्त्रियांचा घाम हुंगायला सांगितला गेला, तेव्हा त्यांना विशिष्ट भावनिक अवस्थांमध्ये निर्माण झालेला घाम अधिक आकर्षक वाटला. इतकेच नव्हे, तर या वासाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्यामध्ये आकर्षण आणि रुचीची भावनाही वाढल्याचं दिसून आलं.

हे संशोधन समजून घेण्यासाठी तीन स्वतंत्र प्रयोग करण्यात आले. पहिल्या प्रयोगात, तरुणांना विविध नमुन्यांचा गंध घेण्यास सांगण्यात आले. असे दिसून आले की, त्यांना सामान्य घामाच्या वासापेक्षा विशिष्ट परिस्थितीत गोळा केलेल्या घामाचा गंध अधिक पसंतीचा वाटला.

निकाल काय लागला?

दुसऱ्या प्रयोगात, हा सुगंध पुरुषांच्या भावनिक प्रतिक्रियांत काही बदल घडवून आणतो का, हे तपासण्यात आलं. त्यानुसार ज्यांना हा महिलांच्या विशेष स्थितीतील घामाचा हुंगायला लावला तेव्हा पुरुषांमध्ये आकर्षणाची पातळी अधिक वाढली होती. तिसऱ्या प्रयोगात, अशा प्रकारचा गंध एखाद्या व्यक्तीच्या इच्छा आणि आवडीनिवडींवर प्रभाव पाडतो का, हे तपासले गेले. या प्रयोगाचे निष्कर्ष असे सूचित करतात की, शरीरातून उत्सर्जित होणारे हे रासायनिक संकेत मानवी वर्तनावर परिणाम करू शकतात.

तज्ज्ञ काय म्हणतात?

तज्ज्ञांच्या मते मानवांमध्येही भावना आणि संकेत गंधाद्वारे पोहोचवले जातात. मात्र, हे केवळ एका विशिष्ट रसायनापुरते मर्यादित नाही. उलट विविध नैसर्गिक घटकांच्या एकत्रित कार्यामुळे हा परिणाम दिसून येतो. हे आकर्षण केवळ बाह्य रूप किंवा संभाषणापुरते मर्यादित नसते. उलट शरीरातून येणारा गंधही त्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

म्हणूनच, कधीकधी कोणतीही स्पष्ट किंवा निश्चित कारणे नसतानाही, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकते. या अभ्यासाचे निष्कर्ष 'आर्काइव्हज ऑफ सेक्स्युअल बिहेवियर' (Archives of Sexual Behavior) नावाच्या नियतकालिकात प्रकाशित झालेत.

Disclaimer: ही माहिती संशोधन अभ्यास आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. याला वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय मानू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Lake Trek : चार वर्षांनंतर ‘ग्रीन लेक ट्रेक’ पुन्हा सुरू; हिमालयाच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्याची पर्यटकांना संधी

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

मोठी बातमी! मुंबईत सीनीएजीचे दर पुन्हा वाढले, आज मध्यरात्रीपासून नवे दर, आता किती किंमत मोजावी लागणार?

UP Election: INDIA आघाडीत धुसफूस? जागावाटपावरून काँग्रेसचा मित्रपक्ष नाराज? अखिलेश यादवांच्या विधानाने चर्चांना उधाण

8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी मिळणार?

SCROLL FOR NEXT