Manasvi Choudhary
हिंदू धर्मात, महिलांच्या हिरव्या बांगड्यांना विशेष महत्व आहे. महिलांच्या सोळा श्रृंगारापैंकी एक म्हणजे हिरव्या बांगड्या.
हिरव्या बांगड्या हे सौभाग्याचे, समृद्धीचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जाते. श्रावण महिन्यात महिला हातात हिरव्या बांगड्या घालतात.
महिलांच्या पारंपारिक मराठमोळ्या लूकमध्ये हिरव्या बांगड्यांना विशेष महत्व आहे. एखाद्या महिलेने हिरव्या बांगड्या घातल्या की घरातील पुरूष मंडळीकडून खास कौतुक होतं.
मराठमोळ्या लूकवर साडीसोबत दागिन्यांमध्ये महिला हिरव्या बांगड्या घालतात तेव्हा पारंपारिक मराठमोळा अंदाज पुरुषांचे लक्ष वेधून घेतो.
हिरवा रंग निसर्गाचे, चैतन्याचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. हातातील हिरव्या बांगड्यांचा खणखणाट आणि हिरवा रंग डोळ्यांना सुखावणारा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा असतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.