Weight Gain Meta ai
लाईफस्टाईल

Weight Gain: लठ्ठपणा नियंत्रणाबाहेर जातोय? कारणे आणि त्यावरील उपाय शोधा!

Weight Gain Causes: सध्याची जीवनशैली पाहता भारतात लठ्ठपणाचे आणि पोटाच्या वाढत्या घेरचे प्रमाण वाढले आहे. त्यात शहरातल्या व्यक्तींचा जास्त प्रमाणात आकडा येतो.

Saam Tv

सध्याची जीवनशैली पाहता भारतात लठ्ठपणाचे आणि पोटाच्या वाढत्या घेरचे प्रमाण वाढले आहे. त्यात शहरातल्या व्यक्तींचा जास्त प्रमाणात आकडा येतो. याच कारण तुम्हाला वाटत असेल आपले वाढते वजन आहे. मात्र असे नसून ते डायबिटीजचे कारण असू शकते. असेच अनेक आजार तुमचा लठ्ठ्पणा वाढवत असतात. त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

तुमचं वजन फक्त डायबिटीज नाही तर हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि ह्रदयरोग यासारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. याशिवाय लठ्ठपणामुळे कर्करोगाचा धोका सुद्धा वाढू शकतो. म्हणूनच भारतात लठ्ठपणाचे प्रमाण का वाढतयं आणि ते कसे थांबवता येईल हे आपण जाणून घेणे महत्वाचे आहे. याबद्दल डॉ. मोहित शर्मा आणि डॉ.शाश्वत चॅटर्जी यांचे महत्वाचे सल्ले आपण जाणून घेणार आहोत.

लठ्ठपणा वाढण्याचं नेमकं कारण काय?

सध्या सगळ्यांना त्यांचा वेळ कॅफे किंवा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये घालवायला आवडतो. तिथे गेल्यावर हमखास तुम्हाला आवडीचे पदार्थ खायला आवडतात. ते तुम्ही एकदा खाल्ले की तुम्हाला त्याची चटक लागते आणि तुमच्या पोटावर त्याचा सगळा परिणाम दिसू लागतो. दुसरं म्हणजे हालचाल न करणे. लोक बऱ्याच वेळेस स्वत: जेवलेलं ताट सुद्धा उचलत नाही. अशा अनेक सवयींमुळे तुमचा लठ्ठपणा वाढतो.

लठ्ठपणा टाळण्यासाठी उपाय

लठ्ठपणा खूप वाढत असेल तर सगळ्यात आधी खाण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत. जितकी कमी ऑयली खाता येईल तितक्या पदार्थांचे सेवन करा. भरपूर भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, प्रथिने आणि निरोगी चरबी यांचा समावेश करा. तेलकट, तळलेले पदार्थ आणि जास्त साखर असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खा.

तुम्ही खाद्य तेलाचा वापर कमी केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय हे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते. त्याचसोबत तुम्ही घरातल्या घरात जितक्या जमतील तितक्या हालचाली करू शकता. जगभरातील 9% अकाली मृत्युचं कारण शारीरिक हालचाली न करणे हेच आहे. आठवड्यातून किमान एकदा सायकलिंग करणे हा सुद्धा एक चांगला उपाय आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT