Guava Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Guava Disadvantages : चुकीच्या वेळी पेरु खाल्यास जडू शकतो खोकल्याचा विकार, जाणून घ्या योग्य वेळ कोणती?

Disadvantages Of Guava : चवीला गोड असलेले पेरू या फळात व्हिटॅमिन सीचे गुणधर्म असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Eating Guava Cause Cough : चवीला गोड असलेले पेरू या फळात व्हिटॅमिन सीचे गुणधर्म असतात. पेरूमध्ये असलेले गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सहकार्य करतात. त्यासोबतच पेरू फायबर आणि अनेक अँटीऑक्सिडेंटने समृद्ध असलेले फळ आहे.

त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी पेरू हे फळ (Fruit) फायदेशीर समजले जाते. मात्र काही लोक पेरू खाल्ल्यानंतर खोकल्याची तक्रार करतात चला तर मग जाणून घेऊ यामागचे कारण आणि पेरू खाल्ल्यानंतर खोकल्याची समस्या टाळण्याचे उपाय.

पेरू खाल्ल्याने खोकला होतो का?

खरतर खोकल्याचा (Cough) त्रास कमी करण्यासाठी पेरू खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, काही लोकांना पेरू खाल्ल्यानंतर खोकल्याचा त्रास सुरू होतो. यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पेरू खाण्याची चुकीची वेळ.

जर तुम्ही संध्याकाळी पेरू खाल्ल्यास सर्दी आणि फ्लू होऊ शकतो. त्यासोबतच ज्यांना कफ आहे अशा लोकांनाही या समस्याचा त्रास होऊ शकतो. पेरू हे फळ थंड असल्यामुळे ज्या लोकांना कफ दोष आहे.

अशा व्यक्तीने तो खाल्ल्यास त्यांना खोकला आणि सर्दीचा त्रास होऊ शकतो. आरोग्याच्या परिस्थितीवरही पेरू खाणे अवलंबून असू शकते. त्यामुळे पेरू खाण्याची योग्य वेळ माहिती असणे तुमच्यासाठी गरजेचे आहे.

पेरू खाण्याची योग्य वेळ -

एका दिवसात केवळ एक पेरू खाणे सुरक्षित असते. जर तुम्ही एका दिवसात यापेक्षा अधिक पेरू खाले, तर तुम्ही आहारी पडू शकता. शक्यतो रात्रीच्या वेळी फळे खाणे टाळा त्यामुळे सर्दी-खोकल्यांचा समस्या उद्भवू शकतात. जेवणादरम्यान किंवा व्यायामापूर्वी पेरू खाण्याची उत्तम वेळ आहे. तसेच उन्हाच्या वेळी फळे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

पेरू खाण्याची योग्य पद्धत -

योग्य पद्धतीने पेरू खाण्यासाठी तुम्हाला पेरू पाण्याने स्वच्छ धुऊन घेयायचे आहे. नंतर पेरू कट करून त्यावर काळे मीठ टाकून खाऊ शकता. त्यामुळे हे सहज पचले जाते आणि सर्दीचा त्रास होत नाही. यासोबतच बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासूनही आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भवानीच्या दर्शनासाठी भाविकांची लूट; बोगस पुजारी आणि एजंटांचा भाविकांना गंडा

Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला

कर्नाटकमध्ये मोठी राजकीय फेरबदल; काँग्रेसनं बदलला प्रदेशाध्यक्ष

Maharashtra News Live Update: - शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खरेदी केंद्र नसलेल्या तालुक्यात नाफेड थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करणार

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या TMC मध्ये उभी फूट, एकाचवेळी ६० आमदारांची सोडचिठ्ठी

SCROLL FOR NEXT