Summer tips in marathi, summer foods
Summer tips in marathi, summer foods ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

उन्हाळ्यातून घराबाहेर जाण्याआधी या पदार्थांचे सेवन करा !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीराची जळजळ होते त्यासोबतच शरीराला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी शरीरात पाण्याची (Water) कमतरता अधिक जाणवू लागते. या उन्हात आपल्याला खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी आपण अशा काही पदार्थांचे (Food) सेवन करणे आवश्यक आहे जे आपल्या शरीराला पोषण तर देईल त्यासोबतच शरीराला हायड्रेटही ठेवेल. उन्हाळ्यात आपले शरीर निरोगी आणि हायड्रेटेड कसे राहील हे जाणून घेऊया.

हे देखील पहा -

उन्हाळ्यात हे पदार्थ खा

१. उन्हाळ्यात द्राक्षे आपल्याला सहज मिळतात. द्राक्ष्यात जीवनसत्त्वे, खनिजे अधिक प्रमाणात आहेत. उन्हात जाण्यापूर्वी द्राक्ष खाल्यास आपली त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल आणि आपल्याला उष्णताही कमी जाणवेल.

२. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपण डार्क चॉकलेटचे सेवन करू शकतो. डार्क चॉकलेट (Chocolate) खाल्ल्याने आपल्याला दिवसभर अँक्टिव्ह राहण्यास मदत होते त्यामुळे शरीरात थकवा जाणवणार नाही. डार्क चॉकलेटच्या सेवनाने डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक दृष्टी यापासूनही बचाव होऊ शकतो.

३. डाळिंबाचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले आयर्न रक्तपेशी तयार करण्यात मदत करते, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. यासोबतच ते उष्णतेमध्ये त्वचेचे रक्षणही करते.

४. पाणी प्यायल्याने उन्हाळ्यातील अनेक समस्यांशी लढा मिळण्यास मदत होते. दिवसभरात वेळोवेळी पाणी प्यायला हवे. यामुळे आपले रक्ताभिसरण तर सुरळीत होतेच पण त्वचेसोबतच संपूर्ण शरीरही हायड्रेट राहते.

या पदार्थांचे सेवन करुन आपण उन्हाळ्यात घराबाहेर पडू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. कृपया तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: झटपट बनवा 'हा' स्वदीष्ट नाश्ता; घरातलेही करतील वाह वाह

Kopardi Death Case: मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या

Today's Marathi News Live : नसीम खान नाराज; पक्षश्रेष्ठींकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु

Josh Baker Death: धक्कादायक! २० वर्षीय क्रिकेटपटूचं निधन, क्रिडाविश्वात शोककळा

India Heat Wave Update: सूर्य आग ओकतोय! देशातील अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम, तापमान 44 ते 47 अंश सेल्सिअसवर

SCROLL FOR NEXT