Raw Garlic Benefits saam tv
लाईफस्टाईल

Raw Garlic Benefits: दररोज एक पाकळी कच्ची लसूण खा; डॉक्टरांनी सांगितलेले फायदे वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Garlic health benefits: दररोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने रक्तदाब, वाईट कोलेस्ट्रॉल आणि रोगप्रतिकारक शक्तीवर काय परिणाम होतो? लसणातील एलिसिनचे फायदे, लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि तो ठेचून दहा मिनिटे ठेवण्यामागील कारण जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

स्वयंपाकघरातल्या अनेक पदार्थांना लसणामुळे छान चव येते. डाळीला फोडणी देण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत लसणाचा वापर केला जातो. पण हीच लसूण आरोग्यासाठीही उपयोगी ठरू शकते. दररोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने रक्तदाब आणि वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठीही लसूण फायदेशीर ठरूते. पण लसूण खाण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

लसणामध्ये कोणते गुणधर्म असतात?

लसणामध्ये ‘एलिसिन’ (Allicin) नावाचे एक एक्टिव्ह कंपोनंट्स असतात. हे कंपोनंट्स शरीरासाठी महत्त्वाचे मानले जातात. उच्च रक्तदाब आणि शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे लसणातील पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासही हातभार लावतात.

डॉ. सलीम झैदी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून लसूण खाण्याचे फायदे आणि तो खाण्याची योग्य पद्धत सांगितलीये.

दररोज लसणाची एक पाकळी खाण्याचे ३ फायदे

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी लसूण फायदेशीर ठरू शकतो. लसणामध्ये असलेले एलिसिन रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. ज्या लोकांना आधीपासूनच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी लसणाचं सेवन उपयोगी ठरू शकतं. मात्र रक्तदाबासाठी सुरू असलेली औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नयेत.

वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत

शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. डॉ. सलीम झैदी यांच्या मते, लसणाचे नियमित सेवन केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात १० ते १५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. लसूण रक्ताभिसरण सुधारण्यासही मदत करू शकतो.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते

शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची असते. लसणामध्ये सल्फरयुक्त संयुगं आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे घटक शरीरातील पेशींना ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’मुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. पण केवळ लसूण खाल्ल्याने संसर्गापासून पूर्णपणे संरक्षण मिळतं असं नाही.

लसूण खाण्याची योग्य पद्धत कोणती?

लसणाचे फायदे मिळवण्यासाठी तो कसा खाल्ला जातो, हेही महत्त्वाचं आहे. डॉ. सलीम झैदी यांच्या सल्ल्यानुसार, लसणाची एक पाकळी घेऊन ती बारीक ठेचावी किंवा चिरावी. त्यानंतर ती साधारण १० मिनिटं तशीच ठेवावी. लसूण ठेचल्यानंतर काही वेळ ठेवल्याने त्यामध्ये एलिसिन तयार होण्याची प्रक्रिया वाढते. त्यामुळे लसणातील या सक्रिय संयुगाचा फायदा मिळण्यास मदत होऊ शकते.

एकूणच लसूण हा रोजच्या आहारातील एक उपयुक्त पदार्थ आहे. त्याचं सेवन रक्तदाब, वाईट कोलेस्ट्रॉल आणि रोगप्रतिकारक शक्ती यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करताना 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!

Maharashtra News Live Update: मिनाक्षी शिंदे राजीनामा प्रकरणावरून शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार, आज खात्यात जमा होणार २००० रुपये; मेसेज येताच लगेच करा चेक

Diabetes Causes: साखर नाही, गोड पण खात नाही, तरीही तुमच्या रक्तातील साखर वाढते? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक कारण

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT