coin and rare note you can earn 8 lakhs from this 5 rupee coin
coin and rare note you can earn 8 lakhs from this 5 rupee coin Saam Tv
लाईफस्टाईल

जुनं ते सोनं! ५ रुपयाच्या कॉईनने कमवा ८ लाख; कसं ते पाहा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: जुनं ते सोनं अशी आपल्याकडे म्हण आहे ती उगाच नाही. बदलत्या वेळेनुसार वस्तूची किंमत कमी-अधिक होत असते. जुने कॉईन, (Coin) मुर्त्या, धातूच्या ऐतिहासिक वस्तू, ऐतिहासिक दस्ताऐवज अशा अनेक वस्तूंच्या किंमती काळानुरुप बदलत जातात. जुन्या आणि ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असणारे त्या गोष्टी खरेदी करण्यासाठी मोठी किंमत मोजतात. ते म्हणतात ना शौक बडी चीज है या म्हणीनुसार लोक आपल्या आवडीसाठी मोठी रक्कम मोजतात. आज पाच रुपयाच्या नाण्याने ८ लाख रुपयांपर्यंत (Collection of historical coins) पैसे कसे कमवायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Earn Rs 8 lakh with old and rare 5 rupee coin; See how)

हे देखील पाहा -

अनेकांना जुन्या चलनाचा संग्रह, नाणे-नोटांचा संग्रह करण्याची आवड असते. त्यामुळे ते अनेकदा अशा शोधात असतात. जर तुमच्याकडेही जुनी नाणी असतील तर तुम्ही लखपती होऊ शकता. सध्या पाच रुपयाचा जुना कॉईन संग्रही ठेवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. हा पाच रुपयांचा कॉईन तुम्हाला रातोरात लखपती बनवू शकतो. हे ५ रुपयांचे नाणे काही किरकोळ नाणे नाही. हे अत्यंत दुर्मिळ नाणे आहे. अन्न आणि कृषी विभागाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त हे नाणे जारी करण्यात आले होते. हे नाणे तुम्हाला ८ लाख पर्यंत पैसे मिळवून देऊ शकते. तुम्ही ते ऑनलाइन लिलावासाठी विकू आणि खरेदी करू शकता. (coin and rare note you can earn 8 lakhs from this 5 rupee coin)

हे ५ रुपयांचे नाणे कसे विकायचे?

- तुम्ही क्वीकर (Quikr) सारख्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तिथे विक्रेता म्हणून नोंदणी करा.

- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.

- त्यानंतर तुमच्या नाण्याच्या दोन्ही बाजूंचे फोटो नीट क्लिक करा.

- एखाद्या खरेदीदाराला हे नाणे दिसताच तो स्वतः तुमच्याशी संपर्क साधेल.

हे लक्षात ठेवा

- सगळ्या नाण्यांवर साररखीच किंमत मिळत नाही.

-सगळेच कॉईन विकल्या जात नाही.

- कॉईनची किंमत ही तो किती जुना किंवा दुर्मिळ आहे यावरुन ठरते.

- अशा व्यवहारात काळजी जास्त घ्यावी. नाण्याची सत्यता तपासावी. आर्थिक व्यवहार तसेच दस्ताऐवजांची सत्यता पडताळावी अन्यथा फसवणूक होऊ शकते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

SCROLL FOR NEXT