Kidney Disease Symptoms google
लाईफस्टाईल

Kidney disease symptoms: किडनी खराब होण्याआधी ही लक्षणं लगेच ओळखा, मान आणि चेहऱ्यावर मिळतात संकेत

Early signs kidney disease: किडनीच्या समस्येची काही सुरुवातीची लक्षणं चेहरा आणि मानेवर दिसू शकतात. सूज येणं, त्वचा निस्तेज होणं, खाज किंवा शिरा फुगणं ही किडनीच्या आजाराची संकेत असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. त्यामुळे या अवयावामध्ये कोणताही बिघाड झाल्यास त्याची लक्षणं लगेच दिसून येतात. या आजाराची काही सुरुवातीची लक्षणं आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर दिसू शकतात. यामध्ये सूज येणं, खाज येणं, त्वचा निस्तेज दिसणं किंवा मानेवरील शिरा फुगणं ही त्यातील काही लक्षणं आहेत.

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, लघवीत बदल, पाठदुखी आणि पायांना सूज येणं ही देखील किडनीच्या समस्येची लक्षणं असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. किडनीच्या समस्येची मानेवर किंवा चेहऱ्यावर सूज येणं, शिरा फुगणं, खाज येणं किंवा त्वचेच्या रंगात बदल होणं असे संकेत दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

चेहरा आणि मानेवर सूज येणं

किडनी योग्यरित्या काम करत नसल्यास शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर टाकणं कठीण होतं. त्यामुळे द्रव शरीरात साचू लागतो. यामुळे डोळ्यांच्या भोवती, गालांवर आणि मानेवर सूज दिसू शकते. त्याचप्रमाणे सकाळच्या वेळी चेहरा आणि मान फुगल्यासारखी वाटू शकते.

त्वचा निस्तेज दिसणं

किडनीचं काम योग्यरित्या होत नसल्यास शरीरात टॉक्सिन घटक साचू लागतात. त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. चेहरा आणि मानेची त्वचा निस्तेज होणं, कोरडी दिसू शकते. त्वचेतील असा बदल किडनीच्या समस्यांचा धोका असतो.

खाज आणि त्वचेवर पुरळ

किडनी शरीरातील धोकादायक द्रव्यं योग्य प्रकारे फिल्टर करू शकली नाही तर त्वचेला खाज येऊ शकते. काही वेळा जळजळ होणं किंवा लाल पुरळ येण्याचा त्रासही होतो. ही लक्षणं अनेकदा चेहरा आणि मानेच्या भागात जाणवू शकतात.

मानेवरील शिरा फुगणं

किडनीच्या काही समस्या असल्यास शरीरात द्रव साठून राहतो आणि रक्तवाहिन्यांवर ताण वाढतो. त्यामुळे मानेच्या दोन्ही बाजूंना असलेल्या शिरा फुगल्यासारख्या दिसू शकतात. हे हृदय आणि किडनीवर वाढलेल्या ताणाचं गंभीर लक्षण असू शकतं.

पाठदुखी आणि इतर लक्षणं

पाठीत किंवा पोटाच्या खालच्या भागात वेदना होणं, पायांना सूज येणं, हात-पाय सुन्न पडणं किंवा स्नायूंना गोळे येणं ही देखील किडनीच्या आजाराची महत्त्वाची लक्षणं असू शकतात. अशी चिन्हं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

वरीलपैकी कोणतीही लक्षणं जाणवत असतील तर स्वतःच कोणतेही उपचार करू नका. योग्य तपासणी करून अचूक निदान होणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

SCROLL FOR NEXT