Are You Using Earphones Wrong? Doctors Warn of Rising Hearing Loss Risk  google
लाईफस्टाईल

Ear Care: इअरफोन वापरताना तुम्ही 'ही' चुकी करत आहात का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला, दिला धोक्याचा इशारा

Earphone Side Effects: इअरफोनचा जास्त आणि मोठ्या आवाजात वापर केल्याने कानाचे गंभीर नुकसान होऊ शकते. WHO ने दिलेल्या सूचनांनुसार सुरक्षित व्हॉल्युम, मर्यादित वापर आणि स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्या लोक डिजीटल युगात वावरताना दिसतात. घरातल्या Tv पासून ते हातातल्या घडाळ्यापर्यंत सगळ्या गोष्टी डिजीटल पद्धतीने वापरता येतात. त्यात लोकांना अनेक ब्रॅंडेड वस्तू वापरण्याची सवय असते. त्यात शुज, चांगला स्मार्ट फोन, बॅग्स, वॉच आणि इअरफोनचाही समावेश असतो. पण याच इअरफोनने तुम्हाला बहिरेपणाच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. कसं? हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती सविस्तरपणे वाचून घ्या.

अनेकांना प्रवासात, रिकाम्या वेळेत, कधीकधी दिवसभर एकांत म्हणून तर काहींना कामासाठी इअरफोनचा वापर करावा लागतो किंवा केला जातो. लोक त्यामध्ये इतके मग्न असतात की, त्यांना लोकांशी बोलण्याचा सुद्धा वैताग येतो. मात्र WHO च्या अधिकृत वेबसाईटवरुन एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. यामध्ये इअरफोनचा वापर केल्याने होणारे दृष्परिणाम सांगितले आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तासंतास लोक कानात इअरफोन घालून बसतात. लोकांना याचं भानच राहत नाही. यामध्ये वायरलेस इअरफोनचाही समावेश होतो.

इअरफोनचा अतीवापर केल्याने काही दिवसात किंवा कमी वयातच ऐकू येणं बंद होतं. सुरुवातीला थोड्या अंतरावरुन बोललेले ऐकू येत नाही. जे लोक मोठ्या आवाजात जास्त वेळ गाणी ऐकतात यांना बहिरेपणाचा धोका जास्त असतो. तसेच काही लोक इअरफोनचा वापर झाल्यावर ते कुठेही धुळ खात ठेवतात. त्यामुळे त्याच्यात सुक्ष्म बॅक्टेरिया चिपकून बसतात. लोक पुन्हा येऊन त्याचा वापर करतात. फार क्वचितच लोक ते आधी स्वच्छ करुन वापरतात. त्याने तुमच्या कानात नकळत इंफेक्शन होतं आणि इतर गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

जे लोक मोठ्या आवाजात गाणी ऐकतात तेव्हा ध्वनी तरंगत कानाच्या बाहेरच्या भागाला आदळतात. मग आत प्रवेश करतात आणि कानाचे पडद्याजवळ Vibrate करतात. हे व्हायब्रेशन कानाच्या आतल्या कोक्लियापर्यंत पोहोचतात, त्यामध्ये हजारो लहान केसांच्या पेशी असतात. त्यावर जेव्हा दाब वाढतो तेव्हा या पेशी त्यांची संवेदनशीलता गमावतात. आणि तुमच्या कानाचे पडदे फाटतात. याने तुम्हाला बहिरेपणाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कमी वेळ इअरफोनचा वापर करा. हेडफोन्सचा वापर अगदी थोडा वेळ रमण्यापुर्ती करा. प्रवासात गाणी ऐकणं शक्य तितकं टाळा. वापरत असलेल्या इअरफोनची रोजच्या रोज स्वच्छता करा. याने तुम्हाला भविष्यातल्या बहिरेपणापासून लांब राहता येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! घरात चारचाकी असेल तर मोठा झटका, रेशन कार्ड कायमचे बंद होणार, वाचा नवे नियम काय आहेत?

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

Jalgaon : विम्याच्या ५० लाखांसाठी कट रचला, पण गेम फसला; डॉक्टर अन् ४ पोलिसांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Kids Height Growth : लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT