Sakshi Sunil Jadhav
मांजरी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तुम्हाला दिवसातून एकदा तरी मांजर दिसतच असेल.
काही जण मांजरींनी खूप प्रेम करतात तर काही तिरस्कार. काहींना मांजर आडवी गेलेली आवडत नाही. घरात पाळलेली आवडत नाही.
मांजर ही एका ठिकाणी खूप पवित्र मानली जाते. त्या ठिकाणी तिची मान-सन्मानाने पूजा केली जाते.
पुढे आपण याबद्दल माहिती जाणून घेण्यार आहोत. जी तुमच्या ज्ञानात भर टाकेल आणि तुमचा तिरस्कारही कमी होऊ शकतो.
तसेच मांजरीची पूजा कोणत्या ठिकाणी केली जाते? हा प्रश्न तुम्हाला स्पर्धा परिक्षेला सुद्धा येतो. त्यामुळे ही माहिती एकदा वाचाच.
प्राचीन इजिप्तमध्ये लोक मांजरीला एक देवी किंवा देवते समान मानतात. जसं की भारतात गाईला मानतो.
मांजरीला इजिप्तमध्ये भाग्यवान मानलं जातं. तसेच चांगले आरोग्य, संपत्ती आणि सौभाग्याचंही प्रतिक मानलं जातं.
मांजरीला इजिप्तमध्ये इजा करणे, मारणे हा एक धर्मातला गुन्हा मानला जातो. त्यामुळे कोणीही त्यांना इजा करण्याचा विचारही करत नव्हते. जपानमध्ये मांजरींची पूजा केली जाते आणि त्यांना बास्टेट देवीचा अवतार मानला जातो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.