Sakshi Sunil Jadhav
आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण आणि सततच्या नोटिफिकेशन्सच्या जगात मन शांत ठेवणं अवघड असतं. अशा वेळी हजारो वर्षांची परंपरा असलेला 'ॐ' जप मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो, असं तज्ज्ञ सांगतात.
तुम्हाला जर रोजच्या ताणापासून मुक्ती आणि काही चांगले बदल आयुष्यात हवे असतील तर 21 दिवस ‘ॐ’ या अक्षराचा जप नक्की करा, असं तज्ज्ञ सांगतात.
'ॐ' उच्चारताना श्वास लांब घेतला आणि सोडला जातो. त्यामुळे हृदयाची गती मंदावते, स्नायू सैल होतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
जप करताना निर्माण होणारी कंपनं मेंदूला सुरक्षिततेचा संकेत देतात. त्यामुळे तणावाची पातळी हळूहळू कमी होते. काही काळासाठी आपण आपल्या समस्या विसरतो.
‘ॐ’ म्हणताना होणाऱ्या हमिंगमुळे व्हेगस नर्व उत्तेजित होतात. याने नर्व भावनिक संतुलन राखण्यास मदत करते.
नियमित जपामुळे अस्वस्थता कमी होते आणि वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. मन एखाद्या गोष्टीवर खोलवर विचार करायला सुरुवात करतं.
मन शांत झाल्याने निर्णयक्षमता सुधारते आणि एकाग्रता वाढते. त्याने तुमचा स्वभाव शांत होतो आणि विचार योग्य पद्धतीने होतात.
राग, भीती आणि चिंता यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. 21 दिवसांत भावनिक स्थैर्य जाणवू लागतं.
जपादरम्यान श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने श्वसन पद्धत सुधारते आणि शरीरातील ऊर्जा संतुलित राहते. ‘ॐ’ च्या शेवटी येणारी काही क्षणांची शांतता मनाला प्रसन्न करते. हाच अनुभव 21 दिवसांत जास्त गहिरा होत जातो.