Dyson Zone Headphone Saam Tv
लाईफस्टाईल

Dyson Zone Headphone : बापरे! बाईकएवढीच हेडफोनची किंमत; असं काय आहे स्पेशल? | Dyson Zone Headphone

Dyson Zone Headphone : कंपनीने Dyson Zone हेडफोन लाँच केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dyson Zone Headphone Price And Features :

डायसन कंपनी ही उत्तम एअर प्युरिफायर आणि होम क्लिनिंग प्रोडक्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. कंपनी नेहमीच नवीन होम क्लिनिंग प्रोडक्ट्स बाजारात लाँच करत असते. परंतु कंपनीने आता बाजारात एक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहे. कंपनीने Dyson Zone हेडफोन लाँच केले आहे.

४ ऑक्टोबरला Dyson Zone Headphone भारतात लाँच करण्यात आले. हे नवीन हेडफोन ओव्हर-द-इअर ब्लूटूथ हेडफोन्स मेटल ग्रिल आणि रिमूवेबल फेस वायजरसह उपलब्ध आहे. हा नवीन हेडफोन आंतरराष्ट्रीय बाजारात याआधीच लाँच झाला आहे. आता हे होडफोन बाजारात लाँच आले आहे.

फीचर्स

या हेडफोनमध्ये तुम्हाला ५० तासांचा कंटीन्यु प्लेबॅक टाइम मिळेल. यात अॅडव्हान्स नॉइस कॅन्सलेशन आणि जबरदस्त ऑडिओ आउटपुट मिळेल. या हेडफोनसोबत डिटॅचेबल वायसरदेखील आहे. ज्यामुळे एअर प्युरिफायर होण्यास मदत होईल. हा हेडफोन चार्ज होण्यासाठी ३ तास लागतील. यामध्ये ११ मायक्रोफोनचा वापर केला आहे. त्यातील ८ मायक्रोफोनचा वापर आजूबाजूचा आवाज कमी करण्यासाठी केला जाते.

यामध्ये एक पारदर्शक मोड (Transparent Mode)देण्यात आला आहे. याचा वापर करुन तुम्ही आवाज कमी करु शकता. हेडफोनमध्ये अतिरिक्त मायक्रोफोन देण्यात आला आहे. ज्याचा वापर कॉलिंग, रेकॉर्डिंग, वॉइस कंट्रोल करण्यासाठी केला जातो.

किंमत आणि व्हेरियंट

कंपनीने या नवीन हेडफोन दोन प्रकारात लाँच केले आहे. Dyson Zone आणि Dyson Zone Absolute+ असे दोन व्हेरियंट लाँच केले आहे. या व्हेरियंटमध्ये अल्ट्रा ब्लू आणि पार्शियन ब्लू असे दोन रंग उपलब्ध आहेत. तर Dyson Zone Absolute+ मध्ये ब्राइट कॉपर आणि पर्शियन ब्लू रंगामध्ये खरेदी करु शकता. हे नवीन हेडफोन तुम्ही Dyson च्या अधिकृत वेबसाइट आणि Dyson Demo स्टोरमध्ये खरेदी करु शकतात.

या हेडफोनची किंमत 59,900 रुपयांपासून सुरू होते. तर Dyson Zone Absolute+ व्हेरियंटची किंमत 64,900 रुपये आहे. या होडफोनची किमत ही एका बाईकच्या किमतीएवढी आहे. कंपनीने यामध्ये इलेक्ट्रो स्टॅटिक कार्बन, व्हिलर क्लीनिंग ब्रश, युएसबी-सी चार्जिंग केबल आणि वायझर स्लीव्हस देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतात पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी? सैन्य दल हायअलर्ट मोडवर, VIDEO

लोकशाहीची लक्तरं, मतदानाची दुकानं, महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, वॉशिंग मशिन, मिक्सर,चांदीचं वाटप

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू

मतदानाआधी पैशांनी भरलेली बॅग आढळली, पाकीटं अन् ५०० च्या नोटाच नोटा! VIDEO

साफसफाई करताना अचानक मोठा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT