लाईफस्टाईल

Dussehra Marathi Wishes: दसरा आणि विजयादशमीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा आणि मेसेजेस

Happy Dussehra: दसरा आणि विजयादशमी २०२५ निमित्त आपल्या कुटुंबीय, मित्र आणि प्रियजनांना खास मराठी शुभेच्छा आणि संदेश पाठवा. हे संदेश आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता शेअर करण्यासाठी आदर्श आहेत.

Dhanshri Shintre

भारतीय संस्कृतीत सणांना खास महत्त्व आहे आणि त्यात दसरा विजयाचं प्रतीक मानला जातो. या दिवशी सत्याचा असत्यावर आणि चांगल्याचा वाईटावर विजय झाल्याची आठवण केली जाते. रामाने रावणाचा पराभव करून धर्म-नीतीचा संदेश दिला, त्याचं स्मरण या सणात होतं. दसऱ्याचा अर्थ फक्त धार्मिक विधींमध्ये नसून, संघर्षाला धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा आणि नव्या सुरुवातीचं बळ देणारा दिवस म्हणून तो भारतभर विविध परंपरांनी साजरा होतो.

दसऱ्याच्या शुभेच्छा म्हणजे आशा, विश्वास आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहेत. या शुभेच्छा लोकांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि दीर्घकाळ टिकतात. या लेखात आम्ही तुम्हाला विविध दसऱ्याच्या संदेश, शुभेच्छा आणि मेसेजेस दिले आहेत, जे तुम्ही आपल्या आप्तेष्ट, मित्र आणि सहकाऱ्यांना आनंदाने पाठवू शकता किंवा सोशल मीडियावर शेअर करू शकता, ज्यामुळे हा सण अधिक आनंददायी बनेल.

वाईटावर चांगल्याचा विजय

दसरा सण घेऊन येतो एक आशा

रावणाप्रमाणे तुमच्या दुःखांचा होवो अंत

नवी पहाट घेऊन येवो नवी सुरुवात

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सत्याचा विजय

असत्याचा पराभव

हाच संदेश घेऊन आला

दसऱ्याचा सण

शुभ दसरा 2025!

आपट्याच्या पानांची होते देवाणघेवाण

प्रेमाचा ओलावा करुनी दान

शुभ दसरा!

दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने,

या वर्षी लुटूयात निरोगी आरोग्याचे सोने!

दसरा, विजयदशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा!

निसर्गाचं दान

आपट्याचं पान, त्याला सोन्याचा मान

तुमच्या आयुष्यात नांदो सुख,

शांती आणि समाधान

दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

Thalapathy Vijay: जन नायकन! थलापथी विजयचा ३३ वर्षांच्या फिल्मी करिअरला रामराम, पूर्णवेळ राजकारणात होणार सक्रिय

Accident : उत्तरखंडमध्ये भयंकर अपघात, बस दरीत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

PM Khaleda Zia : बांग्लादेशवर शोककळा! पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन

Election: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा नवी मुंबईत एकला चलोचा नारा, शिवसेना- भाजप आमने-सामने; संभाजीनगरमध्येही युती तुटली

SCROLL FOR NEXT