Monsoon Child Care Saam Tv
लाईफस्टाईल

Monsoon Child Care: पावसाळ्यात मुलं सतत आजारी पडतात? रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते? अशी घ्याल आरोग्याची काळजी

Child Care Tips : पावसाळात अनेक आजार डोकी वर काढतात. सर्दी-पडसे, ताप-खोकला यामुळे अनेकांच्या नाकी नऊ येते.

कोमल दामुद्रे

Immunity Booster Food : पावसाळा म्हटलं की, आपसुकच आपली नजर जाते ती खिडकीबाहेर. थंड वार, पावसाच्या सरी आणि घरात खेळणारी मुलं. हा ऋतू खरेतर हिरवळीचा असतो परंतु, तितकाच त्रासदायक आणि आजारांचा.

पावसाळात अनेक आजार डोकी वर काढतात. सर्दी-पडसे, ताप-खोकला यामुळे अनेकांच्या नाकी नऊ येते. या ऋतूमध्ये अनेक संसर्गजन्य आजार बाहेर येतात. अशावेळी योग्य व पुरेसा आहार खाणे गरजेचे असते. मुलांच्या रोगप्रतिकारशक्तीमधील चढउतार मात्र नक्कीच नियंत्रित करता येतात. अबॉट न्यूट्रिशन बिझनेसच्या मेडिकल अँड सायन्टिफिक अफेअर्स विभागाचे संचालक डॉ. गणेश काढे सांगतात फ्लूच्या मोसमात आपल्या मुलांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती सांभाळण्याचे तीन प्रकार आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल

1.रोगप्रतिकारशक्तीला सर्वाधिक प्राधान्य द्या

फळे, भाज्या, कडधान्ये आणि प्रथिनांसारख्या अन्नपदार्थांनी समृद्ध आहारातून भरपूर रोगप्रतिकारशक्ती मिळते. तसेच यासाठी झोपण्याची (Sleep) नियमित वेळ (Time) निश्चित करणेही अधिक महत्त्वाचे आहे, कारण झोपेच्या अभावामुळेही रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते व मुलांना सर्दी आणि फ्लू सारखे आजार होण्याचा धोका वाढतो.

अ जीवनसत्वाची रेलचेल असलेले पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीचे कार्य व्यवस्थित पार पाडले जाण्यास मदत होते. अ जीवनसत्वाचे काही उत्तम स्त्रोत आहेत, ज्यांचा समावेश रोजच्या आहारात असायला हवा. अ जीवनसत्वाने समृद्ध अशा या पदार्थांमध्ये गाजर, रताळी आणि लाल ढोबळी मिरची यांसारख्या भाज्यांचा तसेच कॅटालोप, अॅप्रिकॉट आणि आंबा यांसारख्या फळांचा समावेश होतो. विशिष्ट प्रकारचे मासे आणि दुग्धजन्य पदार्थ यांतही अ जीवनसत्व असते.

जीवनसत्व (Vitamins) हे रोगप्रतिकारशक्तीला अधिक प्रभावी बनविणारे जीवनसत्व म्हणून प्रसिद्ध आहे. संत्री आणि ग्रेपप्रुट्ससारखी लिंबूवर्गीय फळे तसेच स्ट्रॉबेरीज, किवी, टोमॅटो तसेच ब्रोकोली, पालक आणि केल सारख्या भाज्यांमध्ये या अत्यावश्यक पोषक घटकाची रेलचेल असते.

ई जीवनसत्व हे शक्तीशाली अँटिऑक्सिडंट आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. बदाम, हेझलनट आणि शेंगदाणे यांसारखी नट्स, तूप आणि तेले, त्याचप्रमाणे सूर्यफुलाच्या बिया, गव्हाचे सत्व आणि ब्रेकफास्ट सीरील्स व फळांच्या रसांसारखे फोर्टिफाइड पदार्थ हे ई जीवनसत्त्वाचे उत्तम स्त्रोत आहेत.

आपल्या मुलांच्या आहारात फळे व भाज्यांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे तुम्हाला शक्य नसेल तर त्यांच्या दुधाच्या ग्लासामध्ये PediaSure टाकून पाहा, जेणेकरून त्यांच्या शरीराच्या पोषणाची गरज पूर्ण होईल. यामुळे दूध चवदार बनेलच पण त्याचबरोबर त्या दुधाच्या ग्लासाचे पोषणमूल्यही वाढेल. हे संपूर्ण आणि संतुलित पोषण आहे, ज्यात डॉक्टरांनी सांगितले की, ३७ पोषक तत्वे आहेत, ज्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

2.व्यायामाला प्रोत्साहन द्या:

शारीरिक व्यायामामुळे चांगली रोगप्रतिकारशक्ती, अधिक चांगली झोप आणि अभ्यासात अधिक चांगले लक्ष लागणे असे अनेक फायदे मुलांना मिळतात. मुलांना व्यायाम करण्यासाठी आणि उत्साहाने खेळण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना व्यायाम करायला सांगा किंवा समवयीन मुलांसोबत प्ले डेट्स ठरवून द्या.

3.मनावरचा ताण दूर करा आणि नवीन उपक्रम हाती घ्या:

मनावर ताण असेल तर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. झोपताना तुमच्या मुलाला एखादी छानशी गोष्ट, एखादे पॉडकास्ट ऐकवा ज्यामुळे त्यांच्या मनावरील ताण कमी होईल. तसेच तुमचे नाते देखील त्यांचासोबत घट्ट होईल. तसेच त्यांना योगर्टमध्ये आणि क जीवनसत्वाने समृद्ध स्ट्रॉबेरीज किंवा ई-जीवनसत्त्वाची रेलचेल असलेले पीनट बटर क्रॅकर्सवर लावणे यांसारखे पदार्थ खाऊ घाला. थोड्या मोठ्या मुलांना स्क्रॅम्बल्ड एग्ज किंवा फ्रेंच टोस्टसारखे प्रथिनांनी समृद्ध नाश्त्याचे पदार्थ खाऊ घाला किंवा जेवणासाठी सलाड किंवा त्यांची आवडती भाजी तयार करताना त्यांची मदत घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

SCROLL FOR NEXT