Health Benefits Of Amla Juice:
हिवाळ्यात आवळ्याचे सेवन केले जाते. आरोग्यासाठी फायदेशीर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे शरीराला आवश्यक ती पोषणतत्वे मिळतात. तुम्हालाही नियमितपणे रोज डाएटमध्ये हेल्दी ड्रिंकचे सेवन करायचे असेल तर आवळ्याचा ज्यूस अत्यंत प्रभावी उपाय आहे. आवळ्याचा ज्यूस पिण्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात ते फायदे कोणते? घरच्या घरी सोप्या पद्धतीने आवळ्याचा रस कसा बनवायचा? सविस्तरपणे पाहूया.
१. पचनासाठी अत्यंत फायदेशीर
आलं आणि हळद या दोन्हीमध्ये शक्तिशाली अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे सकाळी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, खाल्लेले अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि पोटफुगी, अपचन तसेच गॅस यांसारख्या समस्या दूर होतात.
२. रोगप्रतिकारशक्ती वेगाने वाढते
सकाळी हे ड्रिंक घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताणतणावापासून दूर ठेवण्यास मदत करतात.
३. रक्ताभिसरण सुधारते
हळद ही हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम मानली जाते. आलं आणि हळदीचे पाणी प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह सुरळीत होतो.
४. वजन कमी करण्यास मदत करते
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्न करत असाल, तर हे ड्रिंक बेस्ट आहे. हळद पचनक्रिया आणि मेटाबॉलिझम सुधारते, तर आल्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते.
साहित्य
आवळ्याचा रस बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे ३-४ आवळा, आलं, काळे मीठ आणि लिंबाचा रस
कृती
सर्वातआधी, ताजे आवळा स्वच्छ धुवून घ्या.
धुतलेल्या आवळ्याचे लहान लहान तुकडे करा.
मिक्सरच्या भांड्यामध्ये आवळ्याचे छोटे तुकडे घाला आणि त्यात थोडे पाणी मिक्स करा.
मिश्रणात आल्याचे तुकडे मिक्स करा आणि संपूर्ण मिश्रण बारीक करा.
या रसमध्ये चवीनुसार काळे मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करा.
त्यानंतर एका सुती कापडाने आवळ्याचा रस गाळून घ्या. जर तुम्हाला घट्ट रस हवा असेल तर तुम्ही न गाळता देखील पिऊ शकता.
टिप
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.