Manasvi Choudhary
आयुर्वेदामध्ये हळदीला महत्व आहे. अनेक शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर केला जातो.
वास्तुशास्त्रामध्ये हळदीचा वापर केला जातो. अनेकजण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळद किंवा हळदकुंड ठेवतात.
वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा हा केवळ येण्या-जाण्याचा मार्ग नसून तिथूनच घरातील ऊर्जा प्रवाहित होते. प्रवेशद्वारावर हळकुंड ठेवल्याने घरात सुख-समृद्धी आणि भरभराट येते.
घराच्या मुख्य दरवाजावर हळद किंवा हळकुंड ठेवल्याने बाहेरील वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि घरात सदैव सकारात्मक वातावरण राहते.
धार्मिक मान्यतेनुसार, हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. मुख्य प्रवेशद्वारावर हळदीची गाठ ठेवल्याने किंवा हळदीने उंबरठ्याची पूजा केल्याने घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात.
हळद वास्तुदोष दूर करण्यास मदत करतात. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.