Dr BR Ambedkar Quotes google
लाईफस्टाईल

Ambedkar Jayanti 2026 Wishes: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार; आयुष्य घडवणारे मराठी, हिंदी- इंग्रजी भाषेतील स्टेटस वाचा

Dr BR Ambedkar Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील प्रेरणादायी शुभेच्छा, कोट्स आणि स्टेटस येथे मिळवा. सोशल मीडियावर शेअर करून समतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा.

Sakshi Sunil Jadhav

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही महाराष्ट्रात मोठ्या धामधूमीत साजरी केली जाते. यंदा १३५ वी जयंती साजरी केली जाणार आहे. हा दिवस बाबासाहेबांचा जन्मदिन आणि ज्ञान दिन म्हणूनही साजरा करतात. तसेच या दिवशी सामाजिक समता आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी मिरवणूका काढल्या जातात. या दिवशी सकाळपासूनच बाबासाहेबांच्या पुतळ्यांना हार घालून, मेणबत्त्या लावल्या जातात.

तसेच त्यांना अभिवादन केले जाते. या जल्लोषात आता डिजीटल माध्यमांचाही समावेश झाला आहे. कोणताही सणवार, मुख्यदिवस हा स्टेटसवर ठेवला जातो. तुम्हीही या दिवशी Whatsapp स्टेटस, किंवा सोशल मीडियावर शुभेच्छा देणार असाल तर ही बातमी वाचा. पुढील माहितीत आपण हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेतल्या शुभेच्छा जाणून घेणार आहोत.

डॉ. बाबासाहेब जयंतीच्या मराठी शुभेच्छा (Dr. B. R. Ambedkar Jayanti 2026 Marathi Wishes)

1. ज्ञानाचा दीप त्यांनी लावला,

अज्ञानाचा अंधार दूर पळवला,

समतेचा संदेश देत,

भारताचा नवा इतिहास घडवला,

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

2. जिथे अन्याय तिथे लढा,

हा दिला त्यांनी मंत्र खरा,

बाबासाहेबांच्या विचारांनी,

प्रकाशमान होवो जग सारा.

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

3. संविधानाचे शिल्पकार,

महामानव विचारांचा आधार,

त्यांच्या कार्याने उजळला,

भारत देश महान अपार

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

4. अंधारातून प्रकाशाकडे,

घेऊन गेले समाज सारे,

बाबासाहेबांच्या विचारांनी,

जीवन झाले उजळून न्यारे

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

5. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,

हा दिला त्यांनी संदेश खरा,

त्यांच्या विचारांनी उजळो,

आपल्या जीवनाचा प्रत्येक वारा.

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

डॉ. बाबासाहेब जयंतीच्या हिंदी शुभेच्छा (Dr. B. R. Ambedkar Jayanti 2026 Hindi Wishes)

1. ज्ञान और समानता के प्रतीक बाबासाहेब को नमन, जयंती की हार्दिक शुभकामनाएँ।

2. जिन्होंने हमें अधिकारों के लिए लड़ना सिखाया, ऐसे महान नेता को सलाम।

3. शिक्षा और संघर्ष का संदेश देने वाले बाबासाहेब को कोटि-कोटि प्रणाम।

4. समानता और न्याय के योद्धा को जयंती पर श्रद्धांजलि।

5. बाबासाहेब के विचार हमें हमेशा आगे बढ़ने की प्रेरणा देते रहें।

डॉ. बाबासाहेब जयंतीच्या इंग्रजी शुभेच्छा (Dr. B. R. Ambedkar Jayanti English Wishes)

1. Salute to the architect of equality and justice. Happy Ambedkar Jayanti!

2. May Dr. Ambedkar’s vision inspire us to fight for truth and rights.

3. A tribute to the man who changed the destiny of millions.

4. Let us follow the path of knowledge and equality shown by Babasaheb.

5. Wishing you a meaningful Ambedkar Jayanti filled with inspiration.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या निवासस्थानी ११ तासांपासून ईडीची झाडाझडती

Watermelon Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर कलिंगडचा फेसपॅक कधी व कसा लावायचा? 5 सोप्या स्टेप्स

Cleaning Hacks : तुम्ही देखील कपडे धुताना जास्त डिटर्जंट वापरताय? ही चूक ठरू शकते धोकादायक

भाजपचे नवनियुक्त मंत्र्याचे निधन! पक्षाचा अनुभवी चेहरा हरपला; राजकीय वर्तुळात हळहळ

CBSE Result 2026: दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT