Epilepsy Awareness Day: saam tv
लाईफस्टाईल

National Epilepsy Day 2026: फिट्स येणाऱ्या व्यक्तीला स्पर्श केल्याने आजार पसरतो? एपिलेप्सीबाबतचे हे ४ गैरसमज आजच जाणून घ्या

Epilepsy Awareness Day: फिट्स म्हणजे काय? एपिलेप्सीचा संसर्ग होतो का? फिट्स आल्यावर जीभ गिळली जाते का? राष्ट्रीय अपस्मार दिनानिमित्त न्यूरोलॉजिस्ट डॉ. आकाश छेडा यांनी फिट्सबाबतचे चार महत्त्वाचे गैरसमज दूर करत योग्य उपचार आणि जनजागृतीचे महत्त्व सांगितले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

फिट्स येणं या आजाराबाबत आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. या आजाराचा संसर्ग होतो, फिट्स आलेली व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकत नाही, असं अनेकांना वाटतं. पण हे समज चुकीचे आहेत. फीट्सबाबत योग्य माहिती नसल्यामुळे रुग्णांना अनेकदा भेदभाव आणि एकटेपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करणं आणि रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळणं गरजेचं आहे. १७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय अपस्मार दिनानिमित्त तज्ज्ञांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

एपिलेप्सी हा मेंदूशी संबंधित आजार आहे. मेंदूमध्ये होणाऱ्या विद्युत हालचालींमध्ये अनियमितता निर्माण झाल्यामुळे रुग्णाला वारंवार फिट्स येतात. जगभरातील लाखो लोक या आजाराने त्रस्त आहेत. पण योग्य तपासणी, औषधोपचार आणि डॉक्टरांच्या नियमित सल्ल्याने अनेक रुग्ण हा आजार नियंत्रणात ठेवू शकतात आणि सामान्य आयुष्य जगू शकतात.

घाटकोपरमधील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. आकाश छेडा यांनी फिट्सबाबत असलेल्या गैरसमजांवर प्रकाश टाकलाय. या आजाराबाबत समाजात असलेली भीती दूर करणं आणि रुग्णांना योग्य मदत करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलंय.

फीट्सबाबतचे ४ गैरसमज आणि त्यामागचं सत्य

गैरसमज- एपिलेप्सी हा संसर्गजन्य आजार आहे

अनेकांना एपिलेप्सीच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने हा आजार होऊ शकतो असं वाटतं. पण हा समज चुकीचा आहे. एपिलेप्सी हा संसर्गजन्य आजार नाही. रुग्णाला स्पर्श केल्याने, मिठी मारल्याने, त्याच्यासोबत जेवण केल्याने किंवा त्याच्या जवळ राहिल्याने हा आजार पसरत नाही. मेंदूतील विद्युत हालचालींमध्ये होणाऱ्या अनियमिततेमुळे हा त्रास होतो.

गैरसमज- फिट्स आल्यावर रुग्णाची जीभ तोंडात मागे जाऊन गिळली जाऊ शकते

फिट्स आलेल्या व्यक्तीची जीभ तोंडात मागे जाऊन ती गिळली जाईल, अशी भीती अनेकांना वाटते. पण प्रत्यक्षात व्यक्ती स्वतःची जीभ गिळू शकत नाही. त्यामुळे अशा वेळी रुग्णाच्या तोंडात बोटे, चमचा किंवा इतर कोणतीही वस्तू घालू नये. त्याऐवजी रुग्णाच्या आजूबाजूला असलेल्या धोकादायक वस्तू बाजूला कराव्यात.

गैरसमज- एपिलेप्सीच्या रुग्णाला नेहमी तीव्र झटके येतात

एपिलेप्सी म्हटलं की, अनेकांच्या डोळ्यांसमोर व्यक्तीला जोरदार झटके येत असल्याचं चित्र उभं राहतं. पण प्रत्येक रुग्णाला एकसारखेच फिट्स येतात असं नाही. काही रुग्णांना तीव्र झटके येतात तर काही जण काही वेळ एकटक पाहत राहतात. काही रुग्ण गोंधळल्यासारखे वागतात, विचित्र संवेदना अनुभवतात किंवा काही काळासाठी आजूबाजूच्या गोष्टींचे भान हरवतात. त्यामुळे काही प्रकारचे फिट्स सहज लक्षातही येत नाहीत.

गैरसमज- एपिलेप्सी असलेले लोक सामान्य आयुष्य जगू शकत नाहीत

एपिलेप्सीचा त्रास असलेल्या व्यक्तीला शिक्षण घेता येत नाही, नोकरी करता येत नाही किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही, असं अनेकांना वाटतं. पण हेही चुकीचं आहे. योग्य उपचार आणि डॉक्टरांच्या नियमित तपासणीमुळे एपिलेप्सीचे अनेक रुग्ण शिक्षण घेऊ शकतात, नोकरी करू शकतात आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आनंदी जीवन जगू शकतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत सुप्रिया सुळे आक्रमक; वंचित शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देण्याची मागणी

Thyroid Symptoms : थायरॉईड असल्यास शरीर देते 'हे' ७ संकेत, सुरुवातीलाच ओळखा अन् उपचार सुरू करा

Online Shopping Scam : ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली नवा स्कॅम! ऑर्डर न करताही घरी पाठवले पार्सल, ग्राहकांकडून उकळले जातात पैसे

Bigg Boss 20 : काझी तौकीरच्या एका कमेंटने मनीष गोयलचा संताप अनावर; घरात केला गोंधळ, नंतर ढसाढसा रडला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार? ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT