Health Tips  Saam tv
लाईफस्टाईल

Health Tips : लागल्यावर लवकर जखम भरत नाही ? मधुमेह नाही तर, असू शकतो 'हे' कारण

तुम्हाला मधुमेह नसेल आणि तरीसुद्धा तुमची जखम भरायला जास्तीचा कालावधी लागत असेल तर...

कोमल दामुद्रे

Health Tips : मधुमेह हा आजार हल्ली प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत आहे. आजच्या या धावपळीच्या जगात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावधान व्हा.

बहुतांश लोक मधुमेह या रोगाचे शिकार झाले आहेत. मधुमेह असणाऱ्या साधारण जखम झाली तरी ती जखम भरून निघायला जास्त वेळ लागतो. परंतु, तुम्हाला मधुमेह नसेल आणि तरीसुद्धा तुमची जखम भरायला जास्तीचा कालावधी लागत असेल, तर स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचा मूर्खपणा तुम्ही करू नका. असं होण्याचं कारण म्हणजे तुमच्या शरीरातील कमी होणारे झिंकचे प्रमाणं. आपल्या शरीरात कमी होणाऱ्या झिंकच्या प्रमाणामुळे आपल्या जखमा बऱ्या होत नाही.

मधुमेह झाल्यावर माणसांच्या जखमा ठीक होण्यास जास्त वेळ लागतो. झिंकच्या कमतरतेमुळे सुध्दा तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी शरीरावरील जखम भरण्यास लागतो.

1. झिंकची कमतरतेमुळे होणारा त्रास

  • झिंक हे आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचे घटक आहे. शरीरातील एका पोषक तत्त्वांपैकी झिंक हे मानले जाते.

  • झिंकच्या कमतरतेमुळे शरीरावरील जखम भरण्यास जास्त वेळ लागतो. जखम भरण्यासाठी झिंक हे फार फायदेशीर ठरते.

  • अशातच आपण आपल्या आहारात झिंकयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

  • यामुळे आपल्या शरीरात झिंकचेप्रमाण व्यवस्थितरित्या टिकून राहते. त्याचबरोबर झिंकच्या कमतरतेमुळे आणखीन समस्या उद्भवू शकतात.

  • जसं की, केस गळणे, लो इम्युनिटी, शरीरामध्ये थकवा जाणवणे, त्याचबरोबर झिंकच्या कमतरतेमुळे त्वचेचे रोग उद्भवण्याचे प्रमाण वाढते.

zinc food

2. झिंक रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे

  1. त्वचेला निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी झिंक हे आपल्यासाठी फायदेशीर असते. आपल्या शरीराला झिंक फार कमी प्रमाणात लागतं.

  2. पण ते तितकंच महत्त्वाचं देखील असतं. अन्यथा, त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात.

  3. त्याचबरोबर झिंकच्या कमतरतेमुळे डायरीया, केस गळणे, सतर्कता कमी होणे, वास आणि चवी मध्ये कमतरता व फरक जाणवणे, वजन कमी होणे अशा पद्धतीची लक्षणे झिंकच्या कमतरतेमुळे दिसून येतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT