Heart Burns Remedies
Heart Burns Remedies  Saam Tv
लाईफस्टाईल

Heart Burns Remedies : काहीही खाल्ल्यावर छातीत जळजळ होते? 'हा' आयुर्वेदिक उपाय करून पाहा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Heart Burns Remedies : सध्याच्या घडीला ऍसिडिटी ही सर्वात जास्त प्रमाणात वाढणारी समस्या बनली आहे. खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि सुस्त जीवनशैलीमुळे अनेक लोकांचे आरोग्य ढासळले आहे. अनेक लोक भरपूर प्रमाणात मसालेदार आणि तळलेल्या पदार्थांचे सेवन करतात.

तळलेले पदार्थ खायला आवडतात. परंतु व्यायाम करायला आवडत नाही. असं केल्याने तुमचा आरोग्य (Health) धोक्यात येऊ शकते. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांच असं म्हणणं आहे की छातीमध्ये जळजळणे ही समस्या ताणतणावाने आणि चिडचिडपणामुळे होऊ शकते.

ऍसिडिटीचे मूळ कारण -

डॉक्टरच्या सांगण्यानुसार या दिवसांमध्ये लोक आपल्या भुकेचा त्याचबरोबर भोजनाच्या गुणवत्तेचा अजिबात विचार करत नाही. जे समोर दिसेल ते खायला सुरू करतात. परंतु असं करणे अत्यंत चुकीचे आहे. वेळी अवेळी सतत खाल्ल्याने तुमची पचनसंस्था बिघडते. म्हणूनच तुम्हाला ऍसिडिटी सारख्या समस्येला सामोरे जावे लागते. चिंता करण्याची गोष्ट म्हणजे.

आता फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर लहान मुलांना देखील ऍसिडिटी या समस्येला तोंड द्यावे लागते. अनियमित खानपानामुळे तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढू लागते. साध्या भाषेत सांगायचं झालं तर , तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारचे विष किंवा गॅस्ट्रिक तयार होऊ लागते.

हे विष वाढल्याने तुम्हाला अन्न पचण्यास जड जाते आणि अन्न (Food) अन्ननलिकेमधून पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करते. असं झाल्याने तुमच्या छातीमध्ये जळजळ, तोंडामध्ये आंबट पाणी येणे, उलटी होणे, पोटात ढवळणे, छातीमध्ये दुखणे त्याचबरोबर मळमळ आणि गिळण्यास प्रॉब्लेम येणे. अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात.

आयुर्वेदिक डॉक्टरांनी डीपी पासून वाचण्याचे तीन उपाय सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊया उपाय -

1. धन्याची चहा -

धन्याची चहा तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. धन्याच्या चहाच्या नियमित सेवनाने तुम्हाला ऍसिडिटी पासून सुटकारा मिळेल. धन्याची चहा बनवण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक मोठा चमचा धने टाका.

त्यानंतर पाच पुदिन्याची पाने टाकून पंधरा ते वीस कढीपत्त्याची पाने टाका. त्यानंतर गॅस वरती पाच मिनिटे कुळी काढून घ्या आणि धन्याचा चहा चाळणीने गाळून कोमट झाल्यावरती प्या.

2. बडीशोप -

बडीशोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असते. अनेकजण जेवणानंतर बडीशेपचं सेवन करतात. बडीशेपच्या सेवनाने अन्न पचण्यास कोणताही अडथळा निर्माण होत. तुम्हाला ऍसिडिटी झाली असेल तर एक चमचा बडीशोप चावून खाल्ल्याने तुमची ऍसिडिटीची समस्या कमी होत जाईल. त्याचबरोबर ऍसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी बडीशोपचा काढा करून देखील पिऊ शकता. शॉपमध्ये उपलब्ध असणारे तेल तुमच्या पाचनसंस्थेला सूधरण्याचे काम करते.

3. गुलाब चहा -

गुलाब चहा आपल्या शरीरासाठी गुणकारी ठरू शकतो. गुलाबाच्या चहाच्या नियमित सेवनाने तुमचे आरोग्य सुदृढ राहते. यासाठी एक कप पाणी घेऊन तीन मिनिटे उकळवा. त्यानंतर पाण्यामध्ये सुक्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून पाच ते दहा मिनिटे पुन्हा ते पाणी उकळवून घ्या. त्यानंतर रात्री झोपायच्या दहा मिनिटे आधी हे पाणी गाळून प्या.

या गोष्टीची काळजी घ्या -

तुमच्या परिवारामध्ये किंवा स्वतःला ऍसिडिटीची समस्या उद्भवत असेल तर तुम्हाला तुमच्या खानपानाकडे विशेष लक्ष द्यायला हवे. याकडे दुर्लक्ष केल्याने तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या गोष्टीचा पुढे जाऊन तुम्हाला जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो. कारण अयोग्य खानपणामुळे तुमच्या आतड्यांवर आणि बौद्धिक क्षमतेवर प्रभाव पडतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter Awareness Programme: मतदान करा हाे... मतदान करा..., मावळात वासुदेव करताहेत मतदारांची जागृती

Teeth Whitening Tips : पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतील; आठवडाभर ट्राय करा 'या' पेस्ट

Nandurbar APMC Market: मिरचीचा ठसका! नंदुरबार बाजार समितीत विक्रमी आवक; ३५० कोटींची उलाढाल

Today's Marathi News Live : पती यशवंत यांनी ४३ वर्षे शिवसेनेला दिली, त्यांची पुण्याई माझ्यापाठी - यामिनी जाधव

Harry Potter Castle Viral Video : रशियाच्या हल्ल्यात हॅरी पॉटरचा राजवाडा जळून खाक, घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर

SCROLL FOR NEXT