Health related tips, diet related tips
Health related tips, diet related tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

स्प्राउट्स खाल्ल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या त्याबद्दल असणारे समज- गैरसमज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : स्प्राउट्स किंवा अंकुरलेले धान्य हे अतिशय शरीरासाठी पौष्टिक अन्नपदार्थ (Food) आहेत. ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असून ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. स्प्राउट्सचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक प्रकारचे लाभ होतात. सकाळच्या नाश्त्यात स्प्राउट्स खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा मिळते. स्प्राउट्सचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही तसेच वजनही (Weight) वाढत नाही आणि शरीरातली लोहाची कमतरता भरुन निघते. याचे सेवन केल्यास बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे जास्त खाणे देखील टाळता येईल.

हे देखील पहा -

जाणून घ्या, वजन कमी करण्यासाठी अंकुर किती फायदेशीर आहेत-

१. अंकुरलेले धान्य हे अनेक प्रकारच्या पोषक तत्वांचा खजिना आहे. यामध्ये प्रथिने, फायबर, लोह, अनेक प्रकारची जीवनसत्त्वे (Vitamins), एन्झाइम्स, थायामिन, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, तांबे, जस्त, मॅंगनीज, पोटॅशियम आदी मुबलक प्रमाणात असतात. याचे सेवन केल्यास भूक लागत नाही व वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

२. स्प्राउट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे आपले पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे आपण कमी अन्नपदार्थ ग्रहण करतो. तसेच, अंकुरलेले धान्य भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करते.

३. यात कोणत्याही कॅलरीज नसल्यामुळे आणि भरपूर प्रमाणात प्रथिने असल्याने, जास्त वजन असलेल्यांनी स्प्राउट्सचे सेवन नियमित करावे. साधारणत: प्री-मेनोपॉजच्या अवस्थेतून जात असलेल्या लठ्ठ महिलांनाही याचे सेवन केल्यास फायदा होतो.

४. अंकुरलेले शेंगदाणे पोटाची चरबी, कंबरेचा आकार, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. तसेच दुपारच्या जेवणात स्प्राउट सॅलडचा समावेश अवश्य करा आणि वजन कमी करण्यास अत्यंत फायदेशीर ठरते.

५. बीन्स स्प्राउट्समध्ये कमी कॅलरीज, फॅट आणि फायबर जास्त असल्यामुळे त्याचे स्नॅक्स म्हणून सेवन केल्यास शरीराचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

SCROLL FOR NEXT