स्वाइन फ्लू म्हणजेच H1N1 हा आजार म्हटलं की, ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव आणि अंगदुखी अशी लक्षणं सर्वसाधारणपणे समोर येतात. मात्र काही वेळा या संसर्गाचा परिणाम डोळ्यांवरही दिसून येऊ शकतो. डोळे लाल होणं, डोळ्यांत जळजळ होणं, डोळ्यांतून पाणी येणं किंवा डोळे चुरचुरणं अशा तक्रारी काही रुग्णांमध्ये दिसू शकतात. त्यामुळे फ्लूसारखी लक्षणं असतानाच डोळ्यांमध्ये लालसरपणा किंवा इतर त्रास जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
स्वाईन फ्लु किंवा H1N1 संसर्ग झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे लाल होणं आणि डोळ्यांत जळजळ होणं अशी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे ताप, खोकला किंवा इतर फ्लूसारखी लक्षणं असताना डोळे लाल होणे किंवा जळजळ जाणवत असेल तर या त्रासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
स्वाइन फ्लूमध्ये काही वेळा डोळ्यांतून सतत पाणी येण्याची समस्याही जाणवू शकते. यासोबत डोळ्यांना दुखणं अशी तक्रारही होऊ शकते. फ्लूची लक्षणं असतानाच डोळ्यांशी संबंधित अशा तक्रारी जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आधीपासूनच एखाद्या आजाराचा सामना करत असलेल्या व्यक्तींनी अशी लक्षणं दिसल्यास विशेष काळजी घ्यावी. फ्लूसारखी लक्षणं असताना डोळे लाल होणे किंवा डोळ्यांशी संबंधित इतर त्रास जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्वाइन फ्लू म्हणजेच H1N1 झाल्यास साधारणपणे ताप, खोकला, घशात खवखव आणि अंगदुखी अशी लक्षणं दिसतात. यासोबत डोळे लाल होणं, डोळ्यांत जळजळ होणं, डोळ्यांतून पाणी येणं किंवा डोळ्यांना दुखणं असा त्रासही जाणवू शकतो. त्यामुळे फ्लूची लक्षणं दिसत असतील आणि त्यासोबत डोळ्यांशी संबंधित तक्रारही जाणवत असेल तर ती दुर्लक्षित न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.