Headaches freepik
लाईफस्टाईल

Headche: तुम्हाला माहित आहे का डोकेदुखीचे वेगवेगळे प्रकार? जाणून घ्या आजाराचा संकेत मिळतो?

Types Of Headaches: डोकेदुखी ही सर्वसामान्य तक्रार असली तरी तिचे प्रकार वेगवेगळे असतात. या लेखात प्रमुख डोकेदुखींचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Dhanshri Shintre

डोकेदुखी ही सामान्य समस्या वाटत असली तरी तिच्या विविध प्रकारांची कारणं, लक्षणं आणि तीव्रता वेगवेगळी असते. काही वेळा ती तात्पुरती असते, तर कधी गंभीर आजाराचे संकेतही असू शकतात. मायग्रेन, ताणतणाव, सायनस यांसारख्या समस्या यामागे असू शकतात. जर डोकेदुखीसोबत चक्कर, उलटी, किंवा दृष्टीसंदर्भातील बदल दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वारंवार त्रास झाल्यास दुर्लक्ष करू नका.

तणाव डोकेदुखी

तणाव, थकवा किंवा चुकीच्या स्थितीत बसल्यामुळे होणारी ही सर्वात सामान्य डोकेदुखी आहे. कपाळावर किंवा डोक्याच्या दोन्ही बाजूंना दडपल्यासारखी वेदना जाणवते. झोपेचा अभाव, डिहायड्रेशन यामुळे ती वाढू शकते. शांत वातावरण, खोल श्वास किंवा पेपरमिंट तेलाने मसाज केल्याने आराम मिळतो.

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाबामुळे होणारी डोकेदुखी ही डोक्याच्या मागच्या बाजूस किंवा संपूर्ण डोक्यात धडधडणारी असते, विशेषतः सकाळी तीव्रतेने जाणवते. झोप घेतल्याने ती कमी होऊ शकते. ही वेदना रक्तवाहिन्यांवर ताण आल्यामुळे होते. चक्कर, अंधुक दृष्टी, छातीत दुखणे यासोबत असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

मायग्रेन

मायग्रेन ही एक मेंदूसंबंधित समस्या आहे, ज्यात डोक्याच्या एका बाजूला तीव्र, ठणकणारी वेदना होते. ही वेदना काही तासांपासून दोन दिवसांपर्यंत टिकू शकते. यासोबत मळमळ, उलटी होणे ही लक्षणे दिसतात. ताण, झोपेचा अभाव आणि हार्मोनल बदल हे मुख्य कारण ठरतात. डॉक्टरांचा सल्ला आवश्यक.

सायनस डोकेदुखी

सायनस डोकेदुखी ही सायनुसायटिस किंवा हंगामी ऍलर्जीमुळे होते, ज्यामुळे नाकाभोवतीच्या भागात सूज येते. कपाळ, गाल, डोळ्यांभोवती वेदना आणि दाब जाणवतो. नाक बंद होणे, ताप आणि सूज देखील दिसू शकते. गंभीर अवस्थेत डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊ शकतात.

टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT