Vastu Tips saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: घरात जुन्या कपड्यांचा ढीग साठवून ठेवता? वास्तुशास्त्रानुसार 'या' चुका टाळा, घरात राहील सतत नकारात्मक उर्जा

Old Clothes Vastu: घरात जुने कपडे साठवून ठेवता? वास्तुशास्त्रानुसार जुने कपडे कोणत्या दिशेला ठेवावेत, फाटलेल्या कपड्यांचे काय करावे आणि चांगले कपडे कधी दान करावेत? जाणून घ्या बेडखाली कपडे ठेवण्यासह टाळावयाच्या महत्त्वाच्या वास्तु चुका आणि नियम.

Surabhi Jayashree Jagdish

अनेकांच्या घरात कपाटात, स्टोअर रूममध्ये किंवा बेडच्या खाली जुने कपडे ठेवलेले असतात. काही कपडे बऱ्याच दिवसांपासून वापरलेले नसतात तर काही फाटलेले किंवा खराब झालेले असतात. असे कपडे अनेकदा जागा अडवतात. पण वास्तुशास्त्रानुसार घरात विनाकारण जुन्या आणि वापरात नसलेल्या वस्तू साठवून ठेवणं चांगलं मानलं जात नाही. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते, अशी मान्यता आहे.

जुने कपडे राहू आणि शनीशी संबंधित मानले जातात. त्यामुळे असे कपडे घरात जास्त काळ ठेवू नयेत, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. मग घरातील जुन्या कपड्यांचे नेमकं काय करावं? ते कोणत्या दिशेला ठेवावेत? याबाबात वास्तू शास्त्रात काही महत्त्वाची माहिती देण्यात आलीये.

जुने कपडे कोणत्या दिशेला ठेवावेत?

घरातील काही जुने कपडे चांगल्या स्थितीत असतील आणि भविष्यात त्यांचा वापर करायचा असेल तर ते व्यवस्थित घडी करून ठेवावेत. वास्तुशास्त्रानुसार, असे कपडे कपाटात किंवा ट्रंकमध्ये दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणं योग्य मानलं जातं.

फाटलेले आणि खराब कपडे घरात ठेवू नका

काही कपड्यांची शिवण उसवलेली असते तर काही कपड्यांचा रंग पूर्णपणे खराब झालेला असतो. असे कपडे वापरण्याच्या स्थितीत नसतील, तर ते कपाटात साठवून ठेवू नयेत. असे कपडे वेगळे काढून टाकावेत किंवा त्यांचा योग्य पद्धतीने पुन्हा वापर करावा.

चांगले जुने कपडे गरजूंना दान करा

काही कपडे चांगल्या स्थितीत असतात पण तुमच्याकडून त्यांचा वापर होत नाही. असे कपडे घरात ठेवण्याऐवजी गरजू लोकांना दान करता येतात. धार्मिक मान्यतेनुसार, शनिवार किंवा अमावस्येच्या दिवशी जुने पण चांगल्या स्थितीतील कपडे दान करणं शुभ मानलं जातं.

जुने कपडे ठेवताना या चुका टाळा

बेडखाली आणि ईशान्य दिशेला कपडे ठेवू नका

जुने कपडे बेडच्या खाली किंवा ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला ठेवणं टाळावं. वास्तुशास्त्रानुसार यामुळे खोलीतील ऊर्जा प्रभावित होऊ शकते. तसंच झोपेशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी मान्यता आहे.

जुन्या कपड्यांनी घर पुसू नका

अनेक घरांमध्ये जुने कपडे पुसण्यासाठी वापरले जातात. मात्र वास्तुशास्त्रानुसार असं करणं शुभ मानलं जात नाही. त्यामुळे घर पुसण्यासाठी जुन्या कपड्यांऐवजी वेगळे कापड वापरणं योग्य मानलं जातं.

फाटलेले कपडे दान करू नका

घरातील जुने कपडे दान करताना त्यांची स्थिती पाहणंही महत्त्वाचं आहे. कपडे फाटलेले असतील किंवा घालण्याच्या योग्य स्थितीत नसतील तर ते कोणालाही दान करू नयेत. गरजू व्यक्तींना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य कपडेच द्यावेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत SBI च्या ग्लोबल IT सेंटरवर सायबर हल्ला; ३.७५ लाख रेकॉर्ड्स चोरीला गेल्याचा दावा

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान कार्डधारकांनो सावधान! ११२ आजारांवरील मोफत उपचार खासगी हॉस्पिटलमध्ये बंद होणार?

Jalna Crime News: शेतात सोन्याने भरलेले सात हंडे! कुंकू, लिंबू, नारळ सोन्यासाठी शेतात अघोरी पुजा; जालन्यातील धक्कादायक प्रकार

भीषण अपघात! ट्रक आणि मिनीबसची जोरदार धडक; १६ जणांचा मृत्यू

Weather Update: पुन्हा चक्रीवादळाचे संकट! 19-20 नोव्हेंबरला वादळ धडकणार; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट

SCROLL FOR NEXT