High Cholesterol google
लाईफस्टाईल

High Cholesterol: अंगाला खूप खाज सुटते, अन् ही 5 लक्षणंही दिसतात? वेळीच व्हा सावध, कोलेस्टेरॉल वाढलेला असू शकतो

Skin Symptoms: त्वचेवर खाज, पिवळसर डाग, गाठी आणि नखांचा रंग बदल हे वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे संकेत असू शकतात. ही लक्षणे वेळीच ओळखून डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांचं हेल्दी खाणं बाजूलाच राहतं. लोक मिळेल ते अन्न किंवा महागड्या हॉटेल्समधले पदार्थ खाणं पसंत करतात. पण याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतं. तुम्ही जितकं हेल्दी खाता तितकं निरोगी आयुष्य जगता. असं डॉक्टर तुम्हाला नेहमीच सांगत असतील. तुमच्या लाइफस्टाइलच्या काही सामान्य वाटणाऱ्या चुकांमुळेच तुमच्या शरीरातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. पुढे आपण याची त्वचेवर दिसणारी लक्षणे जाणून घेणार आहोत.

कोलेस्टेरॉलची लक्षणं म्हणजे डोकंदुखी, थकवा किंवा छातीत दुखणं इत्यादी असतात, असा अनेकांचा समज आहे. पण शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल त्वचेवर आधीच इशारा देतं. तुम्हाला त्वचेवर काही वेगळी आणि अनोखी लक्षणं दिसत असतील, तर ती दुर्लक्ष करू नका. वेळेत ही चिन्हं ओळखली, तरच गंभीर आजारांपासून स्वतःचं संरक्षण करता येईल.

पिवळसर डाग दिसणे

जर तुमच्या डोळ्यांच्या भोवती किंवा पापण्यांवर पिवळसर डाग दिसत असतील, तर हे हाय कोलेस्टेरॉलचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. या डागांनी वेदना होत नाहीत. पण कालांतराने वाढू शकतात आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात.

गाठी दिसणे

काही लोकांच्या हात, पाय, गुडघे किंवा कोपरांवर लहान पिवळसर किंवा मेणासारख्या गाठी दिसतात. या गाठी शरीरातला फॅट साठल्यामुळे तयार होतो. अशी लक्षणं दिसली की समजा तुमचा कोलेस्टेरॉल वाढला आहे.

त्वचेवर खाज येणे

त्वचेत अचानक जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवत असेल, तर हेही वाढलेल्या वाईट कोलेस्टेरॉलचं संकेत असू शकतं. हाय कोलेस्टेरॉलमुळे रक्तप्रवाहात अडथळे येतात, त्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.

जखमा होणे

पाय दिवसभर थंड राहणं किंवा लहान जखम भरून यायला खूप वेळ लागणं हेही दुर्लक्षित करण्यासारखं नाही. धमन्यांमध्ये प्लाक साचल्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि त्याचा परिणाम तुमच्या हाता-पायावर दिसतो. त्यामुळे जखमा लवकर भरून येत नाहीत.

नखांचा रंग

नखांचा रंग फिकट पिवळसर किंवा निळसर होणं हे देखील हाय कोलेस्टेरॉलचं लक्षण असू शकतं. रक्ताभिसरण जर योग्य होत नसेल तर नखं आणि त्वचेला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत आणि ती कमकुवत दिसते. अशी लक्षणे तुम्हाला दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप: या बातमीत दिलेली माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे. कोणतीही लक्षणं आढळल्यास किंवा शंका असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT