Chips side effects SAAM TV
लाईफस्टाईल

Chips side effects: भूक लागली की चिप्स खाताय? पाहा तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक ठरतेय ही सवय

Eating chips daily : रोज चिप्स खाण्याची सवय वजन वाढणे, रक्तदाब, वाईट कोलेस्ट्रॉल आणि पचनाच्या समस्यांचा धोका वाढवू शकते. चिप्सऐवजी ड्रायफ्रूट्स, मखाणे, फळे आणि घरगुती पॉपकॉर्नसारखे आरोग्यदायी पर्याय निवडणे फायदेशीर ठरू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना चिप्स खायला आवडतात. ऑफिसमध्ये काम करताना, टीव्ही पाहताना किंवा भूक लागली की पटकन काहीतरी खावंसं वाटलं तर अनेक जण चिप्सचं पाकीट उघडतात. टेस्टी आणि सहज उपलब्ध असल्यामुळे हा खाऊ अनेकांचा आवडता बनलाय. मात्र रोज चिप्स खाण्याची सवय नकळत शरीरासाठी घातक ठरतेय याची तुम्हाला जाणीव आहे का? ही सवय आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम करते, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

चिप्स इतके आवडतात का?

चिप्सची चव, कुरकुरीतपणा आणि त्यात वापरलेले मसाले यामुळे ते खाण्याची इच्छा वारंवार होते. मीठ, तेल आणि विविध फ्लेवर्स यांच्या मिश्रणामुळे चिप्स खूप आकर्षक वाटतात. त्यामुळे अनेकदा किती चिप्स खाल्ले याचाही अंदाज राहत नाही आणि नकळत जास्त प्रमाणात सेवन होते.

रोज चिप्स खाल्ल्याने कोणते धोके वाढू शकतात?

रक्तदाब वाढण्याचा धोका

बहुतेक पॅकेटबंद चिप्समध्ये मीठाचं प्रमाण खूप जास्त असतं. शरीरात जास्त मीठ गेल्यास रक्तदाब वाढू शकतो. दीर्घकाळ रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

वजनात वाढ

चिप्समध्ये कॅलरी भरपूर असतात मात्र शरीराला आवश्यक पोषक घटक फार कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे वारंवार चिप्स खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. विशेषतः शारीरिक हालचाल कमी असलेल्या लोकांमध्ये हा धोका अधिक असतो.

वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं

अनेक प्रकारचे चिप्स तयार करताना आरोग्यासाठी हानिकारक अशा तेलांचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊन हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो.

पचनसंस्थेवर परिणाम होतो

चिप्सचं जास्त सेवन केल्यास पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकांना पोट फुगणं, गॅस होणं किंवा अॅसिडिटीचा त्रास जाणवू शकतो. तंतुमय पदार्थ कमी आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने आतड्यांचं आरोग्यही हळूहळू बिघडू लागतं.

मुलांच्या खाण्याच्या सवयी बिघडतात

लहान मुलांना चिप्सची सवय लागल्यास त्यांची फळं, भाज्या आणि घरचं पौष्टिक अन्न खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. याचा त्यांच्या वाढीवर, शारीरिक विकासावर आणि एकूण आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते

चिप्ससारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वं आणि खनिजं फार कमी असतात. त्यामुळे अशा पदार्थांचं नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.

चिप्सऐवजी काय खाऊ शकता?

खाण्याची इच्छा झाल्यास चिप्सऐवजी काही आरोग्यदायी पर्याय निवडता येतात. भाजलेले ड्रायफ्रूट्स किंवा बिया, ताजी फळं, कमी मीठाचे घरगुती पॉपकॉर्न, भाजलेले मखाणे तसंच भाज्यांचे काप आणि हेल्दी डिप्स हे चांगले पर्याय ठरू शकतात. हे पदार्थ चवीलाही चांगले लागतात आणि हेल्दी देखील असतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS transfer : राज्यात पुन्हा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाची कुठे झाली नियुक्ती

Shraddha Kapoor - Eetha : श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाला विरोध; नाव बदलण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Coaching Centre Fire : अग्नितांडव! कोचिंग क्लासला भीषण आग; १५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

Pune Tourism : शनिवार-रविवार काय करताय? पाहा तळेगावाजवळील 'हा' सीक्रेट पिकनिक स्पॉट

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात अखेर दमदार पावसाने पुनरागमन

SCROLL FOR NEXT