Oral Cancer: सतत तोंड येतंय आणि आवाजही बदललाय? तोंड्याच्या कॅन्सरची 3 सुरुवातीची लक्षणं ओळखा

Surabhi Jayashree Jagdish

तोंडाचा कॅन्सर

तोंड येणं किंवा आवाजात बदल होणं ही सामान्य समस्या वाटू शकते पण काही वेळा ही लक्षणं गंभीर आजाराचे संकेतही ठरू शकतात. विशेषतः छाले दीर्घकाळ बरे होत नसतील किंवा आवाजात सतत बदल होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. ओरल कॅन्सरची सुरुवात अशाच छोट्या लक्षणांमधून होऊ शकते.

Oral Cancer Symptoms | saam tv

तोंडातील जखमा

तोंडातील त्वचा अतिशय नाजूक असल्यामुळे गरम पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा इतर किरकोळ कारणांमुळे तोंड येणं सामान्य मानलं जातं. बहुतेक वेळा या जखमा काही दिवसांत आपोआप बरे होतात आणि विशेष उपचारांची गरज भासत नाही. मात्र तोंड वारंवार येत असतील किंवा लवकर बरे होत नसतील तर त्याकडे लक्ष द्या.

Persistent Mouth Sores | saam tv

ओरल कॅन्सरची लक्षणं

सतत तोंड येणं, आवाजात बदल होणं आणि तोंडाच्या आतील भागात पांढरे किंवा लाल डाग दिसणं ही ओरल कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. याशिवाय हिरड्या किंवा गालांच्या आतील भागात सूज येणंही धोकादायक आहे

Hoarse Voice | saam tv

तंबाखू आणि मद्यपानामुळे वाढतो धोका

तंबाखू, पानमसाला आणि मद्यपान हे ओरल कॅन्सरची प्रमुख कारणं मानली जातात. या पदार्थांचं नियमित सेवन केल्याने तोंडातील पेशींवर परिणाम होतो आणि कॅन्सरचा धोका वाढतो.

Mouth Lesions | saam tv

तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

तोंडाची योग्य स्वच्छता न राखल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. नियमित दात न घासणं, दात आणि हिरड्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं यामुळे ओरल कॅन्सरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे दातांची स्वच्छता आणि नियमित दंत तपासणी अत्यंत आवश्यक आहे.

White Patches In Mouth | saam tv

ही लक्षणं दिसल्यास सावध व्हा

जर तोंडातील जखमा दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्या आणि वेदना वाढू लागल्या तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. चावताना किंवा गिळताना त्रास होणं, दात सैल होणं आणि तोंडातील जखम हळूहळू वाढणं हीदेखील गंभीर लक्षणं आहेत.

Cancer Awareness | saam tv

आवाजातील बदल

सर्दी किंवा खोकला नसतानाही आवाज बराच काळ बसलेला किंवा जड वाटत असेल तर ते सामान्य समजू नये. हा त्रास घसा किंवा तोंडातील गंभीर समस्येचा इशारा असू शकतो. काही प्रकरणांमध्ये हे ओरल कॅन्सरचंही लक्षण असण्याची शक्यता असते.

Smoking And Cancer | saam tv

डिस्क्लेमर

या लेखामध्ये दिलेल्या टिप्स केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. आरोग्याशी संबंधित कोणताही फिटनेस कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी, आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा कोणत्याही आजारावरील उपाय अवलंबण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Doctor | saam tv

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान पुढं कुठे पळून गेला?

येथे क्लिक करा