Tuesday Remedies Lord Hanuman saam tv
लाईफस्टाईल

Bada Mangal: ज्येष्ठ महिन्याच्या अखेरच्या बडा मंगलला करा हे उपाय; घरात पैश्यांसोबत येईल सुख-समृद्धी

Bada Mangal 2025 Upay: ज्येष्ठ महिन्यातील मंगळवारला बडा मंगल म्हणतात. या तिथीला हनुमानजींची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. यासोबतच विशेष उपायांनी तुम्ही प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.

Surabhi Jayashree Jagdish

ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवाराला बडा मंगल किंवा बुधवा मंगळ म्हटलं जातं. या वर्षी ज्येष्ठ महिना १३ मे रोजी सुरू झाला आहे. अशातच तो उद्या म्हणजेच बुधवारी बुधवार ११ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला संपणार आहे. या वर्षी ज्येष्ठ महिन्यात एकूण पाच मंगळवार आहेत, ज्यातील शेवटचा मंगळवार १० जून २०२५ रोजी आहे.

जरी हनुमानजींची पूजा दर मंगळवारी केली जाते तरी ज्येष्ठ महिन्यात येणारा मंगळवार धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानण्यात येतो. असं मानलं जातं की, भगवान राम आणि हनुमानजी ज्येष्ठ महिन्याच्या मंगळवारी पहिल्यांदा भेटले होते. त्यामुळे बुधवा मंगल किंवा बडा मंगल हा दिवस भगवान श्री रामांचे प्रिय भक्त भगवान हनुमानाच्या पूजेसाठी समर्पित आहे.

हनुमानाची पुजा केली जाते

ज्येष्ठ महिन्यातील बडा मंगल दिवशी बजरंगबलीच्या जुन्या रूपाची पूजा करण्यात येते. यावेळी हनुमानाच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. तसंच या दिवशी लोकं उपवास करतात, पूजा करतात, मंगला आरतीमध्ये सहभागी होतात. यासोबतच काही उपाय केल्याने जीवनात चमत्कारिक बदल होतात आणि संकटं दूर होण्यास मदत होते.

बडा मंगळच्या दिवशी काय उपाय करावेत?

शेवटच्या बडा मंगल दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर, केशर किंवा लाल रंगाचे कपडे घालावेत. यानंतर कोणत्याही हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी जा. भगवान हनुमानाला सिंदूर लावा, चोळा अर्पण करा आणि चमेलीचे तेल अर्पण करा.

भगवानांना प्रसन्न करण्यासाठी, लाल फुलं, लाल कपडे इत्यादी अर्पण करा. तुम्ही गुळ, केशर भात, इमरती किंवा जलेबी, लाडू आणि नारळ इत्यादी भोग म्हणून अर्पण करू शकता. या सोप्या पद्धतीने पूजा केल्याने, हनुमानजी त्यांचे आशीर्वाद देतील आणि पैशाची कमतरता दूर होऊ शकते.

हनुमान चालीसा पठण

भगवान हनुमानाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हनुमान चालीसेचं पठण करा. जरी तुम्ही दर मंगळवारी हा उपाय करू शकता. परंतु हा उपाय शेवटच्या बडा मंगळला करा. शक्य असल्यास, बडा मंगलला कमीत कमी ५, ७ किंवा ११ वेळा हनुमान चालीसेचं पठण करा.

हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, बडा मंगलला लाल रंगाच्या वस्तू दान करा. या दिवशी लाल मसूर, लाल कपडे आणि गूळ इत्यादी दान करणं चांगलं मानण्यात येतं. यामुळे कुंडलीतील मंगळ दोष दूर होतो. बडा मंगलला माकडांना केळी, गूळ, हरभरा इत्यादी खाऊ घातल्यानेही हनुमानजींचे आशीर्वाद मिळतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT