लाईफस्टाईल

Raviwar Upay: रविवारच्या दिवशी करा 'हे' उपाय; सूर्यदेवाच्या कृपेने आयुष्यातील समस्या होतील दूर

Sunday remedies for good luck: ज्योतिषशास्त्रानुसार, रविवार हा दिवस सूर्य देवतेला समर्पित आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो, जो मान-सन्मान, आरोग्य, आणि आत्मविश्वासाचा कारक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • रविवार हा सूर्यदेवाचा पवित्र दिवस आहे.

  • नवीन कामासाठी बांबूचे तुकडे लावावेत.

  • पती-पत्नीच्या नात्यात गोडवा वाढवण्यासाठी चंदन-केसराचा लेप वापरावा.

रविवार हा सूर्यदेवाचा दिवस असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यास उत्तम फल मिळतं असं मानण्यात येतं. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मताने, रविवारच्या दिवशी संयोग देखील घडून येणार आहेत. यावेळी काही उपाय केल्यास संबंधित व्यक्तीला चांगले परिणाम मिळू शकतात.

रविवारच्या दिवशी करावयाचे सोपे उपाय

नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी

जर आपण एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू इच्छित असाल तर ऑफिस किंवा दुकानाच्या मुख्य दरवाज्यावर सहा-सहा इंच लांबीचे दोन बांबूचे तुकडे लावा. या तुकड्यांचे दोन्ही टोक उघडे असावेत. जर बांबू नसेल तर बांबूपासून बनवलेली बासरी वापरू शकता आणि त्यासोबत मोरपिस लावल्यास अधिक शुभ मानले जाते.

कार्यक्षेत्रात यशासाठी

जर प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर रविवारच्या दिवशी स्नानानंतर मंदिरात जाऊन भगवानाला फुलं अर्पण करा. हात जोडून प्रणाम करा आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.

घरात सौहार्द राखण्यासाठी

धनसंपत्ती असूनही कुटुंबात एकोपा नसेल तर पुनर्वसु नक्षत्रात दोन बासऱ्या घेऊन त्या घराच्या बीमच्या दोन्ही टोकांना लाल कपड्याने बांधा. लक्षात ठेवा की बासरीचे तोंड घराच्या मुख्य दरवाज्याकडे असावे.

पती-पत्नीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी

रविवारी पांढऱ्या चंदनाला दगडावर घासून त्यात थोडे केशर मिसळा आणि त्याचा लेप तयार करा. नंतर मंदिरात किंवा घरी भगवानाच्या प्रतिमेला तिलक लावा. उरलेल्या लेपाने स्वतःच्या आणि आपल्या जीवनसाथीच्या कपाळावर तिलक केल्याने नाते अधिक गोड होते.

मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी

रविवारी आपल्या मुलांच्या हातून मंदिरात गूळ दान करायला द्या. त्यानंतर "ॐ घृणिः सूर्याय नमः" या मंत्राचा १०८ वेळा जप करा. शक्य असल्यास मुलांनीही मंत्रोच्चारात सहभागी व्हावे.

विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी

जर विवाहात अडथळे येत असतील किंवा तुमच्या मुलीच्या विवाहात अडचण असेल तर विष्णू-लक्ष्मी यांच्या प्रतिमेसमोर आसन घालून "ॐ लक्ष्मीनारायणाय नमः" या मंत्राची एक माळ जपा. जप पूर्ण झाल्यानंतर भगवानाला भाजलेल्या पिठात मिसळलेल्या साखरेचा नैवेद्य अर्पण करा.

दीर्घायुष्य व आरोग्यासाठी

रविवारी सूर्यदेवाच्या प्रतिमेसमोर जमिनीवर बसून गंध, फुलं इत्यादींनी पूजन करा. त्यानंतर दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा.

मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी

मुलांच्या शिक्षणाविषयी चिंता असेल तर रविवारी लाल फूल घेऊन सूर्यदेवाला अर्पण करा. त्यानंतर "ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्याय श्रीं नमः" या मंत्राचा ११ वेळा जप करा.

रविवारी नवीन कामाची सुरुवात कशी करावी?

मुख्य दरवाज्यावर बांबूचे तुकडे किंवा बासरी लावावी.

पती-पत्नीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी काय करावे?

चंदन-केसराचा लेप तयार करून कपाळावर तिलक लावावा.

मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणता उपाय करावा?

मुलांनी गूळ दान करावा आणि "ॐ घृणिः सूर्याय नमः" मंत्राचा जप करावा.

विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी कोणता मंत्र जपावा?

"ॐ लक्ष्मीनारायणाय नमः" या मंत्राची एक माळ जपावी.

मुलांच्या शिक्षणासाठी रविवारी काय करावे?

लाल फूल अर्पण करून "ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्याय श्रीं नमः" या मंत्राचा ११ वेळा जप करावा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad Police : फिल्मी स्टाईलने १५ किमी पाठलाग; सराईत चोरटा ताब्यात, साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत

Pune Police : भर दिवसा दरोडा टाकला, पुणे पोलिसांनी सिने स्टाईल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

IND vs PAK : पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, टीम इंडिया संभ्रमात, गौतम गंभीर म्हणाला...

Beed : जामीनावर सुटताच स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी; बीड शहरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT