Arthritis Symptoms Google
लाईफस्टाईल

Arthritis Symptoms: गुडघेच नाही, अंगठ्यावरुन ओळखता येतो संधिवात, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Thumb Pain: अंगठ्यातील वेदना दुर्लक्षित करू नका, कारण ती संधिवाताची सुरुवात असू शकते. सोप्या चाचणीने ओळख शक्य असून, योग्य वेळी उपचार घेतल्यास त्रास नियंत्रणात राहू शकतो.

Sakshi Sunil Jadhav

वय वाढत असताना सांध्यांची दुखणी वाढत जातात. ही सामान्य गोष्ट मानली जाते. पण, फक्त गुडघेच नाही तर हाताच्या अंगठ्यातल्या वेदनाही गंभीर आजाराचं लक्षण असू शकतात. असं तज्ज्ञ म्हणतात. बऱ्याचदा लोक अंगठ्यातचं किरकोळ दुखणं किंवा अस्वस्थता थकवा म्हणून दुर्लक्षित करतात, पण हेच पुढे जाऊन संधिवाताचे (आर्थरायटिस) चं लक्षण ठरू शकतं.

तज्ज्ञांच्या मते, हातातले कार्पोमेटाकार्पल जॉइंट (CMCJ) हा भाग आर्थरायटिसमुळे जास्त प्रभावित होतो. हा सांधा अंगठ्याच्या खूप तळाशी, मनगटाजवळ असतो. वस्तू घट्ट पकडणं, मोबाइल वापरणं किंवा लहानसहान कामं करणं यासाठी हा सांधा महत्त्वाचा असतो. पण या सांध्यातले कार्टिलेज हळूहळू घासलं जातं तेव्हा काही गंभीर समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते.

तुम्ही या आजाराची ओळख घरच्या घरीही करु शकता. यासाठी अंगठा आणि तर्जनी एकत्र आणून चिमटी बनवण्याची साधी टेस्ट करायची असते. या प्रक्रियेदरम्यान अंगठ्याच्या खालच्या सांध्यात तीव्र वेदना, टोचल्यासारखं जाणवणं किंवा दाब जाणवत असेल, तर ते कार्टिलेज खराब होत असल्याचे संकेत दिसतात. तसेच काही इतर लक्षणांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी सांध्यांभोवती सूज किंवा लालसरपणा दिसतो, सकाळी उठल्यावर सांधे आखडल्यासारखे वाटतात, हाताची पकड कमकुवत होते आणि चहाचा कप किंवा पुस्तक उचलताना त्रास होतो ही लक्षणं दुर्लक्षित करता कामा नयेत.

तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीच्या टप्प्यात फिजिओथेरपी आणि काही खास व्यायामांच्या मदतीने हा त्रास कमी करता येऊ शकतो. तसेच, सांध्यांवरचा ताण कमी करण्यासाठी योग्य पद्धतीने वस्तू पकडण्याची सवय लावणंही गरजेचं आहे. पण तुमच्या हाताच्या वेदना कायम राहिल्या असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक|VIDEO

Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायतीचे पोटनिवडणूक जाहीर; मतदान आणि निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

2029 साली वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांचं मोठं विधान

सुवेंदू अधिकारींच्या पीएची गोळ्या झाडून हत्या, निकालानंतरही बंगलामध्ये हत्येचं सत्र सुरूच

SCROLL FOR NEXT