Period blood color: पीरियड ब्लडचा रंग सांगतो तुमचं आरोग्य; 'या' रंगांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा

Surabhi Jayashree Jagdish

मासिक पाळी

मासिक पाळीदरम्यान रक्ताचा रंग बदलणं ही अनेक महिलांमध्ये दिसणारी सामान्य गोष्ट आहे आणि त्यामागे शरीरातील विविध नैसर्गिक कारणं असू शकतात. हार्मोन्समधील बदल, रक्ताचा वेग, गर्भाशयातील स्थिती आणि शरीराची एकूण तब्येत यावर रक्ताचा रंग अवलंबून असतो.

menstrual health

ब्राऊन रंग

ब्लडचा रंग ब्राऊन असेल तर सहसा जुन्या रक्ताचे संकेत असतात. हे शरीरातून बाहेर पडण्यास थोडा वेळ लागतो. पाळीच्या सुरुवातीला किंवा शेवटी हा रंग दिसणं पूर्णपणे सामान्य मानलं जाते.

blood color meaning

काळा रंग

काळा रंग म्हणजे खूप जुनं आणि ऑक्सिडाइज झालेलं रक्त असतं. जे गर्भाशयात जास्त वेळ राहिलेलं असतं. पाळीच्या शेवटच्या दिवसांत हा रंग दिसणं सामान्य आहे. मात्र यासोबत वेदना किंवा दुर्गंधी असेल तर ते इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं.

women health

गुलाबी रंग

पिंक रंगाचे रक्त हे हलक्या प्रमाणात रक्त आणि सर्व्हिकल फ्लुइड मिसळल्यामुळे दिसतं. हा रंग सहसा पाळीच्या सुरुवातीला किंवा हार्मोनल बदलांमुळे दिसतो. कधी कधी शरीरात इस्ट्रोजेनची पातळी कमी असल्यासही हा रंग दिसू शकतो.

period symptoms

लाल भडक

लाल भडक रंग म्हणजे फ्रेश आणि प्रवाहाने बाहेर पडणारं रक्त असतं. हा रंग पाळीच्या मधल्या दिवसांत दिसणं सर्वात सामान्य आहे. याचा अर्थ रक्तप्रवाह नियमित आणि नॉर्मल आहे.

menstrual cycle

डार्क लाल रंग

डार्क लाल रंगाचं रक्त हे थोडे जुन्या रक्ताचे संकेत असतात, जे शरीरातून हळूहळू बाहेर पडतं. हा रंग सहसा सकाळी किंवा पाळीच्या सुरुवातीला दिसतं.

hormone changes

हलका ग्रे

ग्रे रंगाचे रक्त हे सामान्य नसतं आणि ते इन्फेक्शन किंवा इतर गंभीर समस्यांचं लक्षण असू शकते. कधी कधी हे मिसकॅरेजशी संबंधित असू शकतं. त्यामुळे हा रंग दिसल्यास तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे.

brown period blood

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

ancient acoustic engineering
येथे क्लिक करा