Blood Cancer saam tv
लाईफस्टाईल

Blood Cancer : रात्री घाम येणं, त्वचेवर निळे डाग दिसणं आणि...! ब्लड कॅन्सरच्या या ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Blood Cancer: ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सौम्य वाटतात पण ती गंभीर असू शकतात. जखमेशिवाय निळे डाग, रात्री घाम येणे, अशक्तपणा आणि वारंवार इन्फेक्शन ही महत्त्वाची लक्षणे असून त्याकडे दुर्लक्ष करू नये

Surabhi Jayashree Jagdish

ब्लड कॅन्सर हा जगातील सर्वात धोकादायक कॅन्सरपैकी एक आहे. त्याची सुरुवातीची लक्षणं जी अनेकदा खूप सौम्य असतात. शारदाकेअर-हेल्थसिटीमधील मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. अनिंद्या मुखर्जी यांच्या मते, ब्लड कॅन्सरची लक्षणं सुरुवातीला नेहमीच स्पष्ट नसतात.

अनेकदा शरीर असे सूक्ष्म संकेत देतं ज्याकडे लोक सामान्य अशक्तपणा, थकवा किंवा हवामानाशी संबंधित लक्षणं समजून दुर्लक्ष करतात. काही प्रकरणांमध्ये इजा न होता शरीरावर निळे डाग दिसणं किंवा रात्री जास्त घाम येणं ही देखील ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.

जखमेशिवाय निळे डाग

ब्लड कॅन्सरमध्ये शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. प्लेटलेट्स रक्त गोठण्यास मदत करतात. जेव्हा ही घट होते तेव्हा त्वचेखाली हलका रक्तस्त्राव होतो ज्यामुळे निळे डाग दिसतात. जर शरीरावर कोणतीही जखम नसतानाही निळे किंवा जांभळे डाग वारंवार दिसत असतील तर ते सामान्य समजू नये.

वारंवार रक्तस्त्राव

एका लहानशा ओरखड्यातूनही जास्त रक्तस्त्राव होणं, वारंवार नाकातून रक्त येणं आणि हिरड्यांमधून वारंवार रक्त येणं ही कधीकधी ब्लड कॅन्सरशी संबंधित लक्षणं असू शकतात. अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, वारंवार होणारा रक्तस्त्राव हे ब्लड कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

रात्री जास्त घाम येणं

जर तुम्हाला रात्री खूप घाम येत असेल तर सर्वात आधी तुम्ही रात्री झोपताना वातावरण कसं आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. उष्ण हवामानात घाम येणं सामान्य आहे. परंतु थंड हवामानात किंवा एसीच्या खोलीतही घाम येणं हे चांगलं लक्षण नाही. जास्त घाम येणं, ज्यामुळे तुमचे कपडे किंवा अंथरूण भिजणं हे कधीकधी ब्लड कॅन्सरसारख्या एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.

या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

  • वारंवार इन्फेक्शन

  • अशक्त वाटणं

  • श्वास लागणं

  • भूक न लागणं

  • वजन कमी होणं

  • सुजलेल्या लिम्फ नोड्स

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT