थंडीत शरीराला उबदार ठेवण्यासाठी रम-व्हिस्की नाही, तर हे पेय घ्या... Saam Tv
लाईफस्टाईल

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी रम-व्हिस्की पिताय, थांबा.. हे पेय घ्या

थंडीचा मोसम (Winter Season) सुरु झाला आहे. थंडीत शरीराला उबदार ठेवण्यासाठी आपण रम (Rum), व्हिस्कीसारख्या मादक पदार्थांचा आधार घेतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : थंडीचा मोसम (Winter Season) सुरु झाला आहे. थंडीत शरीराला उबदार ठेवण्यासाठी आपण रम (Rum), व्हिस्कीसारख्या मादक पदार्थांचा आधार घेतो. तर, थंडीच्या दिवसात पाणी कमी पितो. कारण, हिवाळ्यात जास्त तहान लागत नाही. तसेच, अनेकांचा असा गैरसमज आहे की या दिवसांमध्ये शरीराला पाण्याची गरज नसते. पण, हे अत्यंत चुकीचं आणि शरीरासाठी घातक (Dangerous) आहे. उलट हिवाळ्यात शरीराला पाण्याची तितकीच गरज असते जितकी उन्हाळ्यात असते. (Do Not Consume Alcohol During Winter To Keep The Body Warm Drink This)

जर तुम्ही हिवाळ्यात (Winter) कमी पाणी (Water) पित असाल तर त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. आवश्यक प्रमाणात शरीराला पाणी न मिळाल्याने शरीर योग्यरित्या कार्य करत नाही आणि तुम्हाला अधिक थंडी लागते. इतकंच नाही तर कमी पाणी पिल्याने आपण आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात खातो. ज्याने आपलं वजन वाढते.

हेही वाचा -

पाणी शरीराला उबदार ठेवण्यात मदत करते -

थंडीच्या दिवसात पाण्याच्या कमतरतेने शरीरावर वाईट परीणाम होतो. शरीराला उबदार ठेवण्यासाठी पाणी हाच सर्वोत्तम पर्याय आहे. जेव्हा आपण थंडीत कमी पाणी पितो, त्यामुळे शरीराचं तामपान कमी होऊ लागतं.

ब्लड सर्कुलेशनवरही परिणाम होतो

योग्य प्रमाणात शरीराला पाणी मिळाल्याने शरीरातील ब्लड सर्कुलेशन योग्य पद्धतीने होते. याने शरीराचं तापमान कमी होऊ लागतं आणि हायपोथर्मियाची परिस्थिती उद्भवते. या स्थितीत शरीर जेवढ्या वेगाने ऊर्जा जनरेट करतो तेवढ्यात वेगात तो ती गमावतोही. त्यामुळे थंडीच्या मोसमात पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे हिवाळ्यात पुरेसे पाणी प्या आणि निरोगी राहा.

मद्यप्राशन शरीरासाठी नुकसानदायक

जर तुम्ही हिवाळ्यात मद्यप्राशन करुन शरीराला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर ही पद्धत चुकीची आहे. रम किंवा व्हिस्कीने तुमच्या शरीराला काही काळासाठी उबदार ठेवते, पण त्यानंतर याने तुमच्या शरीराचं तापमान कमी होऊ लागतं. त्यामुळे अधिक थंडी वाटते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raw Banana Curry Recipe: फक्त काही मिनिटांत बनवा हिरव्या केळ्याची स्वादिष्ट करी, वाचा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

SCROLL FOR NEXT