Gold Silver Cleaning Saam Tv
लाईफस्टाईल

Gold Silver Cleaning: दिवाळीआधी घरीच चमकवा सोन्या-चांदीचे दागिने; सोप्या टिप्स करा फॉलो

Golder Silver Jewellery : तुम्ही सोने चांदीचे दागिने घरगुती पद्धतीने स्वच्छ करु शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gold Silver Jewellery Cleaning Tips At Home:

काही दिवसातच दिवाळीला सुरूवात होणार आहे. दिवाळी म्हटल्यावर नवीन वस्तूंची खरेदी तसेच जुन्या वस्तूंची साफसफाई केली जाते. दिवाळीत आपण अनेकदा सोने- चांदीची खरेदी करतो. सोने चांदी खेरदी केले नाही तरी घरी असलेल्या वस्तूंना पॉलिश करतो.

सोने चांदी पॉलिश करण्यासाठी आपण सोनाराकडे देतो. सोनाराकडे पॉलिश करण्यासाठी दिल्याने खूप पैसे खर्च होतात. मात्र, याच सोने चांदीच्या दागिन्यांची सफाई तुम्ही घरच्या घरी करु शकतात. स्वयंपाकघरातील काही वस्तू वापरुन अगदी कमी किंमतीत या वस्तू चकचकीत करु शकतात.

टूथपेस्ट

सोने चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट वापरु शकता. टूथपेस्ट वापरुन तुम्ही चांदीच्या वस्तू स्वच्छ करु शकता. टूथ पावडर किंवा टूथपेस्ट जुन्या ब्रशवर घेऊन भांडी किंवा वस्तू घासून घ्या. त्यानंतर काही वेळाने गरम पाण्याने ही भांडी धुवून टाका.

लिंबू

सोने-चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करु शकता. लिंबामधील अॅसिड वस्तूंवरील काळेपणा दूर करतो. लिंबू आणि मीठ वापरुन तुम्ही चांदीच्या वस्तू आणि दागिने साफ करु शकता. लिंबाच्या रसात मीठ घालून त्याचा वापर करा. तसेच गरम पाण्यात कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी पावडर टाका. त्यानंतर चांदीची भांडी त्यात ठेवा. काही वेळाने ही भांडी स्वच्छ धुवून टाका.

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याच्या साहाय्याने तुम्ही सोन्याचे दागिने चमकवू शकता. यासाठी २ चमचे सोडा गरम पाण्यात विरघळवून त्याची पेस्ट बनवायची आहे. त्यात दागिने अर्धा तास ठेवा. यानंतर हलक्या हाताने भांडी घासून स्वच्छ करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT