Diwali Special Chivda Recipe yandex
लाईफस्टाईल

Diwali Special Chivda Recipe: 'या' ट्रिक्सचा वापर करुन तयार करा पातळ पोह्यांचा चिवडा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळीला आता बोटावर मोजण्याइतकेच दिवस उरले आहेत. सगळेचं जण आता फराळाच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येकाला फराळात वेगवेगळे पदार्थ आवडतात. असाच एक सगळ्यांचा आवडता पदार्थ आपण तयार करणार आहोत.आपण आज १ किलो पोह्यांचा चिवडा तयार करणार आहोत.मात्र चिवडा तयार करताना आपले माप चुकते आणि आपला चिवडा कधीचं परफेक्ट तयार होत नाही. बऱ्याच वेळेस आपला चिवडा आकसतो लगेच नरम होतो.त्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीचा वापर करु शकता आणि कुरकूरीत पोहे तयार करु शकता.

दिवाळी फराळ विशेष पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

१ किलो पातळ पोहे

१०० ग्रॅम तेल

२०० ग्रॅम कच्चे शेंगदाणे

२०० ग्रॅम डाळवं

१०० ग्राम सुक्या खोबऱ्याचे काप

१ कप काजुचे काप

हिरव्या मिरचीचे तुकडे

कढीपत्ता

१ मोठा चमचा हळद

१/४ चमचा हिंग

चवीनुसार मीठ

२ मोठे चमचे पिठीसाखर

१ चमचा चाट मसाला

कृती

सर्वप्रथम तुम्ही पातळ पोहे उन्हात काही तास वाळवून घ्या. ही स्टेप तुम्ही चिवडा तयार करण्याआधी करा. त्याने तुमचा चिवडा आकसणार नाही. आता पोहे तयार करायला आपण सुरुवात करुया. गॅस ऑन करुन आपण त्यावर एक कढई ठेवू. कढईत एकत्र पोहे न टाकता थोडे थोडे पोहे भाजून घेवू. हे पोहे मध्यम आचेवर भाजून घ्या. हलके पोहे गरम झाल्यावर एका कागदावर हे पोहे काढून घ्या.

आता त्याकढईत आपण तेल अ‍ॅड करुन घेवू. तेलात शेंगदाणे मिक्स करुन ते व्यवस्थित सोनेरी रंगात तळून घ्या. तळलेले शेंगदाणे पोह्यांवर टाकून घ्या.पुन्हा त्यात डाळवं आणि खोबऱ्याचे काप तळून चिवड्यावर टाकून घ्या. त्याच तेलात तुम्ही काजु तळून घ्या आणि चिवड्यावर टाकून घ्या. आता त्या तेलात आणखी एक चमचा तेल अ‍ॅड करा. तेलात हिरवी मिरची आणि कधीपता तळा घाला. याचा रंग थोडा बदलला तर की गॅस बंद करा.

आता त्या तेलात हळद आणि हिंग मिक्स करा.एक मिनिटं हळद परतल्यावर ही फोडणी आता पोह्यांवर टाकून घ्या. हाताच्या साहाय्याने तुम्ही चिवडा मिक्स करुन घ्या. चिवडा थोडा थंड झाला की, मीठ आणि पिठी साखर मिक्स करा. आता तयार चिवडा हवा बंद डब्यात स्टोअर करुन ठेवा.चला तयार झाला कुरकुरीत खमंग चिवडा.

Written By : Sakshi Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NZ vs SA Women's T20 World Cup 2024 : न्यूझीलंडनं पहिल्यांदाच जिंकला टी २० वर्ल्डकप, दक्षिण आफ्रिकेचं स्वप्न पुन्हा भंगलं!

Ravindra Dhangekar: 'माझा विजय पक्का, विरोधकांच्या छातीत आत्तापासूनच धडकी', रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर पलटवार

Hitendra Thakur: हितेंद्र ठाकूर वसईतून लढणार, कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर केली घोषणा

Maharashtra News Live Updates: निलेश राणे धनुष्यबाण घेणार हाती, २३ तारखेला शिवसेनेत करणार प्रवेश

Maharashtra Politics: मुखात दादा, मनात साहेब? दिलीप वळसे पाटलांच्या भूमिकेने समर्थक संभ्रमात?

SCROLL FOR NEXT