Diwali gifting ideas google
लाईफस्टाईल

Diwali Gifts: मिठाईंना बाय-बाय! या दिवाळीत द्या अशा प्रीमियम भेटवस्तू ज्या ३ महिन्यांपर्यंत खराब होणार नाहीत

Diwali Premium Hampers: या दिवाळीत मिठाईला विसरून द्या प्रीमियम गिफ्ट हॅम्पर्सची भेट. ड्रायफ्रूट्स, कुकीज आणि ऑरगॅनिक स्नॅक्ससह हे हॅम्पर्स ३ महिने टिकतात आणि हेल्दी तसेच लक्झरी असाही टच देतात.

Sakshi Sunil Jadhav

दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली आहे.

दिवाळीला मिठाई देण्याऐवजी इतर महत्वाच्या गोष्टी देऊ शकतो.

जे लोक शुगर खात नाहीत त्यांना मिठाई देऊ नये.

कमी पैशांत प्रिमियम गिफ्ट घेता येतात.

दिवाळीला मिठाईचा खप मोठ्या प्रमाणात होतो. कारण येणाऱ्या पाहूण्यांना लोक दिवाळीच्या शुभेच्छांसोबत मिठाईचा बॉक्स देत असतात. मात्र बरेच जण मिठाई खात नाहीत. अशावेळेस ती फेकून द्यावी लागते. या ऐवजी तुम्ही काही गिफ्ट हॅम्पर दिलेत तर त्या वस्तु ३ महिने टिकतील आणि दिवाळीसाठी हे परफेक्ट गिफ्ट असेल.

दिवाळी जवळ येताच बाजारपेठा रंगीबेरंगी रोषणाईने उजळून निघतात. घरांची सजावट, कपडे, मिठाई आणि भेटवस्तूंची खरेदी यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतं. मात्र यावर्षी गोड पदार्थांना मागे टाकत लोक एक वेगळ्या प्रकारच्या भेटवस्तूंना घरेदी करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यासाठी काही सुटकेस हॅम्परचा वापर तुम्ही करु शकता.

सूटकेस हॅम्पर

दिवाळीत पारंपरिक मिठाईऐवजी लोक आता लक्झरी गिफ्ट हॅम्पर्सकडे वळले आहेत. रायपूर, पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या शहरांत 'सूटकेस हॅम्पर्स'ची मागणी वाढली आहे. यात बाकलावा, ड्रायफ्रूट्स, कुकीज आणि चॉकलेट्स असतात जे ३ महिने टिकतात. व्यापाऱ्यांच्या मते, ही भेट फक्त गोड नाही, तर प्रीमियम फील देणारी आहे.

हेल्थ-कॉन्शस लोकांसाठी गिफ्ट हॅम्पर

अनेकजण आरोग्याबद्दल जागरुक झाले आहेत. त्यामुळे साखरेच्या मिठाईऐवजी लोक शुगर फ्री बेक्ड पदार्थ, ओट्स कुकीज, ट्रेल मिक्स, आणि ऑरगॅनिक स्नॅक्स हॅम्पर्स भेट देत आहेत. हे हॅम्पर्स केवळ आरोग्यदायी चांगले आणि २-३ महिने खराबही न होणारे असतात.

कस्टमाइज्ड लक्झरी हॅम्पर्स

ऑनलाइन स्टोअर्स आणि स्थानिक बेकरीज ग्राहकांसाठी कस्टमाइज हॅम्पर्स देत आहेत. थीम बेस्ड हॅम्पर्स जसे की Wellness Box,Tea Lovers Hamper, Chocolate Luxe Pack यांची मागणी झपाट्याने वाढते आहे. ग्राहक आपल्या आवडीचे पदार्थ, सुगंधी मेणबत्त्या, आणि लहान शोपीसेसही यात घेऊ शकतात.

दिवाळीतल्या प्रीमियम गिफ्ट हॅम्पर्समध्ये कोणकोणत्या गोष्टी देऊ शकतो.

ड्रायफ्रूट्स, कुकीज, चॉकलेट्स, ऑरगॅनिक स्नॅक्स अशा वस्तूंचा समावेश गिफ्ट हॅम्पर्समध्ये असतो.

मिठाईऐवजी गिफ्ट हॅम्परमध्ये काय देऊ शकतो?

जे हॅम्पर्स जास्त काळ टिकतात, आरोग्यदायी असतात आणि प्रीमियम फील देतील अशा गोष्टी.

हेल्थ-कॉन्शस लोकांसाठी कोणते पर्याय आहेत?

शुगर फ्री बेक्ड पदार्थ, ओट्स कुकीज, ट्रेल मिक्स आणि ऑरगॅनिक स्नॅक्स हॅम्पर्स हे उत्तम पर्याय आहेत.

अशा हॅम्पर्स कुठे मिळतात?

ऑनलाइन गिफ्टिंग वेबसाईट्स, स्थानिक बेकरीज आणि लक्झरी स्टोअर्समध्ये कस्टमाइज्ड थीम बेस्ड हॅम्पर्स सहज उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रूपाली चाकणकरला बघतेच; रूपाली ठोंबरेंचा पोलिस ठण्यातच ठिय्या, नेमके काय आहे प्रकरण? VIDEO

Kalyan : 28 वर्षीय तरुणीने बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं, १५ दिवसांपूर्वी आली होती बहिणीकडे

Sindhudurg Tourism : जोडीदारासोबत तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ, 'हे' ठिकाण सिंधुदुर्गच्या सौंदर्यात भर घालते

Satara Doctor Case : सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, मुख्यमंत्री फडवीसांनी काढला थेट आदेश

Maharashtra Live News Update: नालासोपाऱ्याच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर हौशी जोडप्याची फजिती

SCROLL FOR NEXT