Sakshi Sunil Jadhav
यंदा दिवाळी १८ ऑक्टोबर रोजी साजरा केली जाणार आहे. या सणाला सर्व स्त्रिया दागिने परिधान करतात. जर चांदीचे दागिने काळे पडलेले असतील तर तुम्ही पुढील टिप्स किंवा हॅक्स वापरु शकता.
एक साधी पांढरी टूथपेस्ट मऊ कापडावर घेऊन दागिन्यांवर हलक्या हाताने घासा. १० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून घ्या आणि कोरड्या कपड्याने पुसा.
एका भांड्यात १ चमचा बेकिंग सोडा आणि थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दागिन्यांवर लावा आणि ब्रशने घासा.
अर्ध्या लिंबाच्या रसात थोडं मीठ टाका. त्यात कापड बुडवून दागिने पुसा. चांदीला पुन्हा जुनी चमक मिळते.
एका बाऊलमध्ये अॅल्युमिनियम फॉइल घालून त्यात गरम पाणी ओता. १ चमचा बेकिंग सोडा टाका आणि दागिने ५ मिनिटांसाठी त्यात ठेवा.
थोड्या सिरक्यात दागिने १०-१५ मिनिटांसाठी भिजवा. मग हलक्या हाताने ब्रश करा.
दागिने वापरल्यानंतर लगेच हवाबंद पाउचमध्ये ठेवा.
परफ्यूम, क्रीम किंवा लोशन लागल्यानंतर लगेच दागिने घालू नका. आणि दागिने ओलसर ठिकाणी ठेवू नका.