Bhaubeej 2023 Wishes Saam Tv
लाईफस्टाईल

Bhaubeej 2023 Wishes : सण बहीण भावाच्या आनंदाचा-उत्साहाचा..., लाडक्या भावाला द्या भाऊबीजेच्या खास मराठीतून शुभेच्छा!

Bhaubeej 2023 Date : भाऊबीज १५ नोव्हेंबर, बुधवारी साजरी केली जाणार आहे.

कोमल दामुद्रे

भाऊबीज शुभेच्छा in Marathi :

दिवाळीत सगळ्यांचा लाडका आणि आनंदाचा सण अर्थात भाऊबीज. हा सण बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. यंदा हा दिवस १५ नोव्हेंबर, बुधवारी साजरा केला जाणार आहे.

हिंदू पंचागानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला साजरा (Celebrate) केला जातो. या दिवशी बहिण (Sister) आपल्या भावाला (Brother) टिळा लावून औक्षण करते. त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धीची प्रार्थना करते. याच सणानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा शुभेच्छा ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. बहिणीची असते भावावर अतूट माया,

मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,

भावाची असते बहिणीला साथ,

मदतीला देतो नेहमीच हात

ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

2. रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,

घेऊन आला हा सण,

लाख -लाख शुभेच्छा तुला,

आज आहे बहीण भावाचा पवित्र सण

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

3. नाते भाऊ बहिणीचे

नाते पहिल्या मैत्रीचे

बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

4. जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!

भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!

भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा!

5. बहिणीची असते भावावर अतूट माया,

मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,

भावाची असते बहिणीला साथ,

मदतीला देतो नेहमीच हात

ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

6. पहिला दिवा आज लागला दारी

सुखाची किरणे येई घरी

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

7. दीपावलीचा आरंभ होतो

पणत्यांच्या साक्षीने

जवळीकतेचा आरंभ होतो

दिव्या दिव्याच्या ज्योतीने

भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT