Diwali 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali 2023: तांब्या-पितळेची भांडी, मूर्ती घरगुती पद्धतीने करा स्वच्छ; स्वयंपाकघरातील या ५ वस्तूंचा वापर करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tips To Clean Brass Items:

दिवाळीत संपूर्ण घर चांगले दिसावे असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी संपूर्ण घराची साफसफाई केली जाते. घरातील सर्व भांडी स्वच्छ धुतली जातात. त्यात पितळीची भांडी, देवांच्या मूर्ती साफ करताना खूप त्रास होतो. पितळेच्या भांड्यावर लगेच धूळ बसते. त्यामुळे त्याची चमक कमी होते. परंतु दिवाळीत या गोष्टी स्वच्छ साफ करायला हव्यात.

दिवाळीत पूजेसाठी पितळेची भांडी, देवाच्या मूर्ती गरजेच्या असतात. त्यामुळे या वस्तू चकाकल्या पाहिजेत. ही भांडी स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागतो. आज आम्ही तुम्हाला घरगुती वस्तूंची माहिती देणार आहोत. ज्याचा वापर करुन तुम्ही ही भांडी स्वच्छ करु शकता.

लिंबू आणि बेकिंग सोडा

लिंबू आणि बेकिंग सोडा वापरुन तुम्ही पितळेची भांडी स्वच्छ करु शकता. एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस वापरुन तुम्ही पितळेची भांडी स्वच्छ करु शकतात. यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस वापरुन पेस्ट बनवा. ही पेस्ट पितळेच्या मूर्तीवर लावा. त्यानंतर एक दोन मिनिटांनी मूर्ती कापडाने पुसून स्वच्छ करावी. त्यानंतर गरम पाण्यात धुवून वाळवावी.

मीठ आणि व्हिनेगर

मीठ आणि व्हिनेगर स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. त्याचा वापर करुन तुम्ही पितळेची भांडी स्वच्छ करु शकतात. यासाठी व्हिनेगर आणि मीठ एकत्र करुन मूर्तीवर लावा. काही वेळानंतर ही भांडी कोमट पाण्याने स्वच्छ करा. यामुळे मूर्तीवर साचलेली घाण आणि धूळ निघून जाईन.

टूथपेस्ट

टूथपेस्ट ही ना फक्त दातांना तर तांब्याच्या आणि पितळ्यांच्या भांड्यांनादेखील स्वच्छ करतात. त्यामुळे पितळेची भांडी अगदी चमकतात. त्यासाठी मूर्तीवर किंवा पितळेच्या भांड्यावर टूथपेस्ट लावा. त्यानंतर कापडाने पुसून घ्या आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

साबण

मूर्तींवर जास्त धूळ बसते. त्यामुळे मूर्ती स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करा. साबण विरघळवून मूर्तीला लावा. त्यानंतर कपड्याने किंवा ब्रशने मूर्तीला घासून स्वच्छ करा.

पितांबरी पावडर

पितांबरी पावडर ही पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी उपयोगी आहे. पितांबरी पावडर बाजारात उपलब्ध असते. ही पावडर मूर्तीवर किंवा भांड्यावर ब्रश किंवा हाताने लावून घ्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT