Dhantrayodashi 2023 (Mata Laxmi Pooja): Puja Vidhi, Muhurt, Date  Dhantrayodashi 2023 (Mata Laxmi Pooja): Puja Vidhi, Muhurt, Date - Saam Tv
लाईफस्टाईल

Dhantrayodashi 2023 Puja Vidhi: दिवाळीच्या पहिल्या दिवशी करा अशी पूजा, लक्ष्मी देवी राहिल सदैव प्रसन्न

Diwali Puja Path : दिवाळीला काहीच दिवस उरले आहेत. हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो.

Shraddha Thik

Dhantrayodashi 2023 Muhurt:

दिवाळीला (Diwali) काहीच दिवस उरले आहेत. हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजने संपतो. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो त्यामुळे धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी एक विशेष पूजा (Puja) केली जाते. कारण धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे व्यक्तीला अनेक फायदे मिळू शकतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी देवी-देवतांचे आवाहन करा

ज्योतिषाच्या मते धनत्रयोदशीच्या आधी सर्व देवी-देवतांचे आवाहन करावे. यामुळे प्रत्येकजण आनंदी होतो. या दिवशी सर्व प्रथम भगवान विष्णू, गणेश, कुबेर देवता आणि इष्ट देवाची पूजा करतात. धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी या देवतांना तुमच्या देवघकरात उत्तर दिशेला ठेवा आणि त्यांची पूजा करा. हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी नक्कीच काहीतरी खरेदी करा.

खरेदीसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या

पंचांगानुसार, खरेदीसाठी शुभ मुहूर्त (Muhurta) 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:57 ते दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 01:30 पर्यंत असेल. त्यामुळे 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेपूर्वी खरेदी करा. संध्याकाळची वेळ देखील खरेदीसाठी शुभ मानली जाते.

या वस्तू खरेदी करा

जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चांदीची नाणी, सोन्याचे दागिने, पितळेच्या वस्तू आणि झाडू खरेदी करू शकता. या दिवशी तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी करू शकता. विशेषत: या दिवशी गणपती आणि माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करा.

धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करू नका

धनत्रयोदशीच्या दिवशी अ‍ॅल्युमिनियमची भांडी किंवा प्लास्टिकची भांडी किंवा धारदार लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत. या दिवशी तेल आणि तूप खरेदी करू नये. यामुळे अशुभ परिणाम मिळू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

SCROLL FOR NEXT