Govardhan Puja 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Govardhan Puja 2023: गोवर्धन पूजेचा मुहूर्त कधी? कशी कराल पूजा, जाणून घ्या सविस्तर

Diwali 2023: दिवाळीच्या काळात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा केली जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Govardhan Puja:

दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या काळात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा केली जाते. यंदा हा सण १३ नोव्हेंबरला हा साजरा केला जाणार आहे. गोवर्धन पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी लाभते.

दिवाळी सणाच्या चौथ्या दिवशी ही पूजा केली जाते. निसर्गाचे महत्त्व लोकांना कळावे यासाठी ही पूजा केली जाते. या दिवशी घरोघरी गोवर्धन पर्वत बांधला जातो आणि श्रीकृष्णाची मूर्ती तयार केली जाते. संध्याकाळी गोवर्धन पर्वत आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते. तसेच त्यांना कढी भात दिला जातो.

मूहूर्त

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी सोमवार, 13 नोव्हेंबरला आहे. या पूजेचा मुहूर्त 13 नोव्हेंबर 2.56 ते 14 नोव्हेंबर 2.36 वाजेपर्यंत आहे. हिंदू धर्मात या तिथीला विशेष महत्त्व आहे. या वर्षी 13 आणि 14 नोव्हेंबरला गोवर्धन पूजेचा उत्सव होणार आहे. या दिवशी संध्याकाळी गोवर्धन पर्वत बांधला जातो. त्याची पूजा केली जाते. गोवर्धन पूजेचा मूहूर्त 5.25 ते 9.36 पर्यंत आहे.

पूजेचे महत्त्व

सर्वांना निसर्गाचे महत्त्व कळावे त्यासाठी गोवर्धन पूजा केली जाते. या दिवशी श्रीकृष्णाने इंद्रदेवाचा स्वाभिमान मोडून आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून ब्रिजवासीयांचे प्राण वाचवले. त्यावेळी श्रीकृष्णाने निसर्गाची पूजा आणि उपासना करण्याचा संदेश सर्वांना दिला. असे म्हणतात. हा दिवस कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेचा होता. तेव्हापासून ही पूजा केली जाते. या दिवशी सर्व प्रकारच्या भाज्या देवाला अर्पण केल्या जातात.

गोवर्धन पूजेच्या दिवशी शेणापासून गोवर्धन तयार केले जाते. त्याला फुलांनी सजवले जाते. संध्याकाळी गोवर्धन पूजा केली जाते. तसेच नैवद्य दाखवला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT