Bhaubeej 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Bhaubeej 2023 : बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण भाऊबीज, शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या

Bhaubeej 2023 Date : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयाला तिथीला दरवर्षी भाऊबीज साजरा केली जाते.

कोमल दामुद्रे

Bhaubeej 2023 Shubh Muhurat :

दिवाळी हा सण वर्षभरातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण. आनंददायी, उत्साही, चैतन्य वाढवणारी दिवाळी. दिवाळीतील सगळ्यांचा आवडता सण भाऊबीज.

भाऊबीजेचा सण हा यम द्वितीया म्हणून ओळखला जातो. भावाला दीर्घायुष्य मिळावे म्हणून बहिण यम राजाची पूजा करते. तसेच त्याला चांगले आणि सुरक्षित आयुष्य लाभावे अशी प्रार्थना देखील मिळेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयाला तिथीला दरवर्षी भाऊबीज (Bhaubeej) साजरा केली जाते. यंदा हा सण १५ नोव्हेंबर बुधवारी साजरा (Celebrate) केला जाणार आहे. यंदा भाऊबीजेला शुभ मुहूर्त कधी? औक्षण कसे कराल? जाणून घ्या

1. भाऊबीजेचा शुभ मुहूर्त कधी?

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला मंगळवारी १४ नोव्हेंबरला दुपारी ०२ वाजून ३६ मिनिटांनी सुरु होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबरला बुधवारी दुपारी १ वाजून ४७ मिनिटांने समाप्त होईल. उदय तिथीनुसार १५ नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाईल.

१५ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून १० मिनिटांनी ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तावर भावाचे औक्षण करु शकता.

भाऊबीज 2023 पूजा विधी

भाऊबीज सणाच्या दिवशी भाऊ-बहिणी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून घरातील मंदिरात दिवा लावतात. या दिवशी भगवान विष्णू आणि गणेशाच्या (Ganesh) पूजेला विशेष महत्त्व आहे. भाऊबीजच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाला घरी बोलावून त्याला टीळा लावून स्वतःच्या हाताने भोजन भरवण्याची प्रथा आहे. शुभ मुहूर्तावर भावाला तिलक लावल्याने जीवनात यश मिळते आणि येणारे सर्व अडथळे दूर होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत खळबळ! हायप्रोफाईल एरियात मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

IND T20 WC 2026: शनिवारी टी-२० वर्ल्डकपचा थरार! टीम इंडिया कोणासोबत करणार दोन हात, १५ शिलेदार कोणते, A टू Z माहिती एका क्लिकवर

Mumbai News: IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलच्या इमारतीवरून मारली उडी

Video Viral: रिलसाठी काहीपण!!! धावत्या लोकलमध्ये लटकत तरूणीचा स्टंट, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT