Relationship Tips Saam, TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : पार्टनरवर प्रेम आहे, पण सतत बोलण्याचा अन् भेटण्याचा कंटाळा आलाय; 'या' टिप्सने नातं पुन्हा पहिल्यासखं खुलेल

Relationship : अनेकदा आपलं आपल्या पार्टनवर प्रेम असतं पण वाद, भांडणे, रुसवे-फुगवे या सर्वच गोष्टींनी व्यक्ती कंटाळतात आणि काही वेळाने मनात प्रेम असलं तरी मन शांतीसाठी पार्टनरसोबत बोलावं वाटत नाही.

Ruchika Jadhav

प्रेमात पडणं सहज सोप्प आहे. मात्र ते प्रेम टिकवून ठेवणं त्याहून कठीण आहे. अनेक तरुण-तरुणी प्रेमात पडतात, एकत्र वेळ घालवतात, एकमेकांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर पार्टनरचा कंटाळा येऊ लागतो. अनेकदा आपलं आपल्या पार्टनवर प्रेम असतं पण वाद, भांडणे, रुसवे-फुगवे या सर्वच गोष्टींनी व्यक्ती कंटाळतात आणि काही वेळाने मनात प्रेम असलं तरी मन शांतीसाठी पार्टनरसोबत बोलावं वाटत नाही.

प्रेमात पडलेल्या, प्रेमात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही काळानंतर असे विचार किंवा अशा भावना येतात. असे तुमच्याबरोबर देखील घडत असेल तर वेळीच सावध व्हा आणि आपलं नातं वाचवण्यासाठी काय काय करता येईल त्याकडे लक्ष द्या. अन्यथा स्वत:च स्वत:च्या प्रेमाला कायमचे गमवून बसाल.

भेटल्यावर जास्तीत जास्त जोक, विनोद करा

आपलं आपल्या पार्टनवर जिवापाड प्रेम असलं तरी त्याचे आणि आपले विचार वेगवेळे असतात. त्यामुळे कुटुंबातील अनेक विषयांवर आपले विचार पटत नाहीत. अशावेळी पार्टनरला भेटल्यावर गप्प आणि शांत बसू नका. त्यापेक्षा दोघांनाही छान वाटेल असे साधे सिंपल जोक करत राहा. त्याने दोघांच्याही चेहऱ्यावर हसू येईल आणि तुम्ही भांडण विसरून जाल.

भविष्यातील गोष्टींसाठी प्लानींग करा

पार्टनरसोबत बोलताना किंवा त्याच्याबरोबर आयुष्य जगत असताना शुल्लक कारणावरून वाद होत असतील बोलण्याचे विषय बदला. तुम्ही पार्टनरबरोबर फ्युचर प्लानींगविषयी बातचीत करा. आयुष्यात पार्टनरला पुढे काय करायचंय याची माहिती जाणून घ्या. तसेच त्यासाठी तुम्हाला जमेल ती मदत त्याला करा.

बॉलिवूडचा तडका

बोरींग रिलेशनमध्ये बॉलिवूडचा तडका आलाच पाहिजे. बॉलिवूड किंवा अन्य तुम्हाला छान वाटतील ते अॅक्शन, ड्रामा आणि रोमँटीक चित्रपट तुम्ही पाहू शकता. चित्रपट पाहिल्याने आपली मानसीक स्थिती विचार करण्याची पद्धत बदलते त्यामुळे तुम्ही हा पर्याय देखील ट्राय करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT