Childhood cancer saam tv
लाईफस्टाईल

Childhood cancer: लहानपणी कॅन्सर झाला होता? मग ही माहिती नक्की वाचा, उपचारांचे 'हे' दुष्परिणाम 30 वर्षांनीही येतात समोर

Childhood cancer survivors: बालपणी कॅन्सरवर यशस्वी उपचार झाल्यानंतरही अनेक वर्षांनी हृदय, फुफ्फुसं, हाडं, हार्मोन्स, स्मरणशक्ती आणि प्रजननक्षमतेवर परिणाम दिसू शकतो. तज्ज्ञांनी नियमित फॉलो-अप, तपासण्या आणि निरोगी जीवनशैली का आवश्यक आहे, याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बालपणी कॅन्सरवर यशस्वी उपचार होणं हा नक्कीच मोठा दिलासा असतो. मात्र उपचार संपले, चाचण्या नॉर्मल आल्या म्हणजे सगळं संपलं असं समजणं योग्य नाही. अनेक मुलांमध्ये उपचारांचे काही दुष्परिणाम लगेच दिसून येत नाहीत. ते काही वर्षांनी कधी १०-२० वर्षांनी तर काही वेळा ३० वर्षांनंतरही जाणवू शकतात. त्यामुळे बालपणी कॅन्सरवर उपचार झालेल्या मुलांनी पुढील आयुष्यातही नियमित वैद्यकीय तपासणी करणं तितकेच गरजेचं आहे.

नोएडातील मेडांता हॉस्पिटलचे वरिष्ठ कन्सल्टंट, मेडिकल ऑन्कोलॉजी, हिमॅटोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभागाचे डॉ. अंकुर नंदन वर्श्नेय यांनी सांगितलं की, मुलांचं शरीर अजून वाढीच्या अवस्थेत असतं. त्यामुळे कॅन्सरवरील उपचारांचा परिणाम त्यांच्या शरीरावर प्रौढांपेक्षा वेगळ्या प्रकारे होऊ शकतो. काही दुष्परिणाम उपचारानंतर अनेक वर्षांनी समोर येतात. यालाच वैद्यकीय भाषेत 'लेट इफेक्ट्स' असे म्हटले जाते.

उशिराने दिसणारे दुष्परिणाम टाळता येतात का?

२०२५ मध्ये World Journal of Clinical Cases मध्ये प्रकाशित झालेल्या एका आढाव्यानुसार, हे दुष्परिणाम पूर्णपणे टाळणं शक्य नसलं तरी त्यांचा धोका कमी करण्यासाठी दीर्घकाळ नियमित तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

उपचारांनंतर कोणते दुष्परिणाम दिसू शकतात?

वाढ आणि शारीरिक विकासावर परिणाम

मेंदू, पाठीचा कणा किंवा हाडांच्या वाढीच्या भागावर रेडिएशन दिलं असल्यास मुलाची उंची किंवा शारीरिक वाढ अपेक्षेपेक्षा कमी होऊ शकते.

प्रजननक्षमतेवर परिणाम

काही प्रकारची केमोथेरपी तसंच पोटाच्या खालच्या भागावर दिलेलं रेडिएशन भविष्यात आई किंवा वडील होण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते.

हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम

अँथ्रासायक्लिनसारखी काही केमोथेरपीची औषधं आणि छातीवर दिलेलं रेडिएशन यामुळे पुढील आयुष्यात हृदयाचं कार्य कमी होणं किंवा फुफ्फुसांची क्षमता घटणं अशी समस्या निर्माण होऊ शकते.

स्मरणशक्ती

लहान वयात मेंदूवर रेडिएशन किंवा काही विशिष्ट केमोथेरपी घेतल्यास शिकणं, लक्ष केंद्रित करणं किंवा स्मरणशक्ती यावर परिणाम होऊ शकतो.

हाडे आणि सांध्यांच्या समस्या

काही मुलांमध्ये हाडांची घनता कमी होणं, हाडं कमकुवत होणं किंवा सांध्यांमध्ये त्रास जाणवू शकतो.

ऐकण्याची क्षमता कमी होणं

सिस्प्लॅटिनसारखी काही केमोथेरपीची औषधं ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात.

हे दुष्परिणाम नेमके कधी दिसतात?

डॉ. वर्श्नेय सांगतात की, प्रत्येक व्यक्तीमध्ये याची वेळ वेगळी असू शकते. त्यामुळे उपचार संपल्यानंतरही नियमित फॉलो-अप खूप महत्त्वाचा आहे.

  • काही दुष्परिणाम उपचारानंतर १ ते ५ वर्षांच्या आत दिसू शकतात.

  • हार्टच्या समस्या, वंध्यत्व किंवा दुसऱ्यांदा कॅन्सरचा धोका १०, २० किंवा अगदी ३० वर्षांनंतरही समोर येऊ शकतो.

  • वाढ आणि हार्मोनशी संबंधित समस्या मुलगा किंवा मुलगी पौगंडावस्थेत पोहोचल्यावर लक्षात येतात.

  • स्मरणशक्ती किंवा शिकण्याशी संबंधित अडचणी शाळेत गेल्यानंतर अभ्यासाचा ताण वाढल्यावर स्पष्टपणे जाणवू शकतात.

हे दुष्परिणाम कसे कमी करता येतील?

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, बालपणीच्या कॅन्सरवरील उपचारांमुळे हार्मोन्स, हाडं, दात, कान, हृदय आणि फुफ्फुसांवर अनेक वर्षांनी परिणाम होऊ शकतो. विशेषतः डोक्यावर दिलेल्या रेडिएशनमुळे वाढ आणि हार्मोन निर्मितीवर परिणाम होऊ शकतो.

उपचारानंतर कोणती काळजी घ्यावी?

  • उपचार संपल्यानंतर अनेक वर्षांनीही ऑन्कोलॉजिस्ट किंवा सर्व्हायव्हरशिप क्लिनिकमध्ये नियमित तपासणी करावी.

  • उपचारानुसार हृदय, फुफ्फुसं, किडनी आणि हार्मोन्सची वेळोवेळी तपासणी करावी.

  • शक्य असल्यास उपचार सुरू करण्यापूर्वीच भविष्यातील प्रजननक्षमतेबाबत डॉक्टरांशी चर्चा करावी.

  • हाडांची घनता तपासून घ्यावी आणि पुरेसं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी घ्यावं.

  • मोठं झाल्यानंतर नियमित कॅन्सर तपासण्या करून घ्याव्यात.

  • शिकण्यात किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणी असल्यास मानसोपचारतज्ज्ञ किंवा शैक्षणिक तज्ज्ञांची मदत घ्यावी.

  • संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि धूम्रपानापासून दूर राहणं गरजेचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain : भातसा धरण ६५ टक्के भरले, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या कोणत्या धरणात किती साठा?

Maharashtra News Live Update: वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नागपूरच्या संविधान चौकातून घेतलं ताब्यात

Rajkummar Rao: 'मोदी है तो मुमकिन है' गाण्यावरून राजकुमार राव ट्रोल; 'तो दबाव तुम्हाला समजणार नाही' म्हणत दिले उत्तर

१८ व्या शतकातील मंदिरात धाडसी चोरी; २८ लाखांची चांदीची पिंड लंपास, पुणे अन् अहिल्यानगरच्या ४ चोरट्यांना ठोकल्या बेड्या

आषाढी एकादशीनिमित्त हातावर काढा मेहंदी, 5 सुंदर आणि सोप्या डिझाईन्स

SCROLL FOR NEXT