Diabetes Control Empty Stomach Foods saam tv
लाईफस्टाईल

Diabetes Control: सकाळी रिकाम्या पोटी खा हे पदार्थ; औषधांशिवाय कंट्रोलमध्ये राहील डायबेटीस

Diabetes Control Empty Stomach Foods: सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या खूप सामान्य होताना दिसतेय. यामध्ये जर तुम्हाला ते नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्ही काही गोष्टी तुमच्या सकाळच्या वेळी उपाशी पोटी खाणं फायद्याचं आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याचा ताणतणाव आणि चुकीच्या आहारामुळे अनेक समस्या आपल्या मागे लागतात. यामध्ये व्यायामही न केल्याने मधुमेहासारख्या तक्रारी उद्धवू शकतात. मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशर या दोन्ही समस्यांना सायलेंट किलर मानलं जातं. याचं कारण म्हणजे हे आजार हळूहळू तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवतात.

एकदा का मधुमेह किंवा बीपीचा त्रास सुरु झाला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. मात्र काही गोष्टींची काळजी घेतल्यास या समस्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं जाऊ शकतं. जर सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही काही गोष्टींचं सेवन केलं तर हाय बीपी आणि डायबेटीजच्या समस्येला कंट्रोल केलं जाऊ शकतं. यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते पाहूयात.

भिजवलेले मेथीचे दाणे

मेथीच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. याशिवाय त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर देखील असतं. मेथीच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. यामध्ये रात्री फक्त १ चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे चावून खा आणि त्याचं पाणी प्या. हे नियमितपणे केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

लसणाच्या पाकळ्या

उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लसूणचा वापर करू शकता. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचा घटक असतो, जो केवळ रक्तदाब कमी करण्यास मदत करत नाही तर रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी १-२ कच्च्या लसूण पाकळ्या चावून खा आणि नंतर एक ग्लास कोमट पाणी प्या.

कच्चा आवळा

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर आहेत. जरी ते शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असले तरी, मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ते रामबाण उपाय ठरू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी फक्त १ ताजा आवळा खा किंवा आवळ्याचा रस प्या.

भिजवलेले बदाम

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाणं हे हृदय आणि मेंदू दोघांसाठीही फायदेशीर मानलं जातं. बदामांमध्ये हेल्दी फॅट, मॅग्नेशियम आणि भरपूर फायबर असतं जे हृदयासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. रात्री ४-५ बदाम भिजवा, सकाळी सोलून घ्या आणि नंतर चावून खा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT