डायबिटिजच्या स्थितीत रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. जेव्हा स्वादुपिंडात इन्सुलिन योग्य प्रकारे तयार होत नाही किंवा तयार होणे बंद होते तेव्हा असे घडते. हा एक जुनाट आजार आहे जो आयुष्यभर राहतो. कोणत्याही प्रकारच्या डायबिटिजमध्ये हे अत्यंत महत्त्वाचे ठरते की, तुम्ही केवळ औषधांवर अवलंबून न राहता तुमच्या जीवनशैलीतही बदल केले पाहिजेत. विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या पाहिजेत. तज्ज्ञांनी नैसर्गिक ड्रींकपासून ते गुड फॅट्स, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्ससाठी काय खावे याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
जर रक्तातीत साखर सतत वाढलेली राहिली तर आरोग्यासंबंधित इतर अनेक समस्या देखील सुरू होऊ शकतात जसे की हृदयाशी संबंधित समस्या, दृष्टी कमजोर होणे, किडनीचा आजार, नसा सुन्न होणे आणि सतत थकवा जाणवणे. त्यामुळे एक हेल्दी डायट अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्वात उत्तम पेये कोणती आहेत?
तज्ञामच्या मते, निरोगी ब्लड शुगरसाठी ग्रीन टी, माचा , ब्लॅक कॉफी, पाणी आणि विना-साखरेचे स्पार्कलिंग वॉटर ही सर्वोत्तम नैसर्गिक पेये आहेत. विना-साखरेचे स्पार्कलिंग वॉटर हे साधे पाणीच असते, परंतु त्यात अजिबात साखर आणि कॅलरीज नसतात. यामध्ये कोणतीही कृत्रिम गोडवा देखील घातलेला नसतो, परंतु कोल्डड्रिंक किंवा सोड्यासारखा फील येतो. त्यामुळे ते डायबेटिस आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी एक सुरक्षित पर्याय मानला जातो.
प्रथिनयुक्त अन्नपदार्थ
निरोगी ब्लड शुगरसाठी आपल्या आहारात काही प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. जसे अंडी, ग्रीक योगर्ट , साल्मन मासा, डाळी आणि एडामे बीन्स (सोयाबीनच्या शेंगा) आहारात समाविष्ट केले गेले पाहिजे.
हेल्दी कार्ब्स असलेले अन्नपदार्थ
जेव्हा रक्तातील साखर वाढते, तेव्हा लोकांना असे वाटते की कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद केले पाहिजेत. पण साध्या कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांमुळे रक्तातील साखर वाढते. त्याऐवजी तुम्ही कॉम्प्लेक्स कार्ब्स घेतले पाहिजेत. हे शरीरात जाऊन हळूहळू पचतात आणि अचानक ब्लड शुगर वाढवत नाहीत . कॉम्प्लेक्स कार्ब्ससाठी तुम्ही ओट्स, बार्ली (सातू/जौ), बीन्स , बेरीज आणि रताळे खाऊ शकता.
हेल्दी फॅट्स असलेले अन्नपदार्थ
डायबिटिजच्या रुग्णांनी आपल्या आहारात हेल्दी फॅट्सला स्थान दिले पाहिजे. यासाठी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, अक्रोड, चिया बिया, बारीक केलेली जवस आणि अवोकॅडो खाणे सर्वोत्तम ठरेल.
टीप : सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.