Alisha Khedekar
रात्री केळी खाल्ल्याने काहींना पोट जड वाटू शकते. पचनाचा त्रास असल्यास झोपण्यापूर्वी खाणे टाळा.
कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असते. रात्री खाल्ल्यास वारंवार लघवीला जावे लागू शकते आणि झोपेत व्यत्यय येऊ शकतो.
संत्र्यामधील आम्लामुळे काही लोकांना अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होऊ शकते. विशेषतः ॲसिड रिफ्लक्स असल्यास काळजी घ्या.
मोसंबीतील आम्ल काहींच्या पोटाला त्रास देऊ शकते. रात्री खाल्ल्यानंतर आंबट ढेकर किंवा जळजळ होत असल्यास वेळ बदला.
अननसातील आम्ल आणि ब्रोमेलेनमुळे संवेदनशील व्यक्तींना तोंडात जळजळ किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते. स्वतःच्या प्रकृतीनुसार सेवन करा.
पेरूमध्ये फायबर भरपूर असते. रात्री जास्त खाल्ल्यास संवेदनशील पचनसंस्था असलेल्या व्यक्तींना गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या जाणवू शकते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा