Dhokla Recipe yandex
लाईफस्टाईल

Dhokla Recipe: पेला ढोकळा खाल्ला का? असा बनवा ग्लास खमंग ढोकळा, पाहा खास रेसिपी

glass dhokla recipe: आजपर्यंत तुम्ही चौकोनी आकाराचा ढोकळा खाल्ला असेल. आज आपण ग्लासाच्या आकाराचा मऊ ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुम्ही ढोकळा प्रेमी असाल तर ही खास रेसिपी तुमच्यासाठी. गुजरातचा प्रसिद्ध ढोकळा अख्या महाराष्ट्राचा आवडीचा खाद्यपदार्थ आहे. एकदम मऊसुत असा हा ढोकळा चवीला खूप स्वादिष्ट असतो. तुम्ही आजपर्यंत चौकोनी आकाराचा ढोकळा खाल्ला असेल. तो ढोकळा तुम्ही एका लांब खोलगट ताटात किंवा भांड्यात तयार केला असेल. पण तुम्ही कधी ग्लासाच्या आकारातला ढोकळा खाल्लाय का? हा ढोकळा लहान मुलांच्या आवडीचा खाद्यपदार्थ ठरु शकतो. चला तर तयार करुया खमंग ग्लासातला ढोकळा.

साहित्य

बेसन

मीठ

हळद

सायट्रिक अ‍ॅसिड

तेल

इनो

ढोकळा बनवण्याची कृती

सर्वप्रथम एका वाडग्यात ३ कप पाणी घ्या. त्यात एक चमचा साखर, चविनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड यांना एकत्र करुन घ्या. आता पाण्यात साखर विरघळल्यानंतर त्यात एक वाटी बेसन अ‍ॅड करा आणि जाडसर बॅटर तयार करुन घ्या. त्यावर १० मिनिटे झाकण ठेवा.

आता स्टीमरमध्ये पाणी गरम करुन घ्या. त्यावर एक स्टॅंड ठेवा. आता बॅटर घ्या. त्याच एक चमचा तेल अ‍ॅड करा. मग एक ग्लास घ्या आणि त्याच्या आतल्या बाजुला तेल लावून घ्या. ही तयारी झाल्यावर बॅटर घ्या आणि त्यात इनो अ‍ॅड करुन व्यवस्थित फेटून घ्या. हे तयार मिश्रण तेल लावलेल्या ग्लासात अ‍ॅड करा आणि स्टीमरमध्ये ठेवा.

साधारण ३० मिनिटांनी झाकण उघडून एका टुथपिकच्या साहाय्याने ढोकळा ओलसर आहे का? हे चेक करा. नसेल तर गॅस बंद करा. ढोकळा थंड झाल्यावर ग्लासमधून ढोकळा बाहेर काढा आणि सुरीने तुम्हाला हवा तो आकार द्या. त्यावर तुम्ही फोटनी देवून ढोकळा सर्व करु शकता.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT